आरोग्य / पोटाची चरबी सात दिवसांत कमी करतील ही 5 पावलं

पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे

रिलिजन डेस्क

Nov 05,2019 12:20:00 AM IST

पोटाची चरबी आपला लूक तर बिघडवतेच आणि अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्सची समस्या निर्माण होते. यासाठी पुढील पाच स्टेप सांगत आहोत ज्यामुळे आपण सात दिवसांत पोटाची चरबी कमी करू शकता.

  • पहिले पाऊल

पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे. यामुळे पोटाच्या स्नायूंवर जलद परिणाम होतो. यानंतर कार्डिओ, मसल्स बिल्डिंग आणि अॅब्स एक्सरसाइज. आठवड्यात २० मिनिटे कार्डिओ एक्सरसाइज, १५ मिनिट मसल्स बिल्डिंग आणि ५ मिनिट अॅब्स एक्सरसाइज करायला हवी. रिव्हर्स क्रंच कोर स्नायू मजबूत करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे.

  • दुसरे पाऊल

पोट कमी करण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन-सी आढळणारे पदार्थ जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्र्याचा समावेश करा. कारण यामुळे चरबी लवकर जळते आणि शरीराला अाकार मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि चरबी शोषतात. हे सर्व करताना जास्त कॅलरी आढळणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा.

  • तिसरे पाऊल

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री ६-७ तास झोप आवश्यक आहे. कमी झोप आपल्या हार्मोन्सला फॅट्स साठवण्यासाठी प्रेरित करते. भरपूर झोप घेतल्याने सकाळी फ्रेश आणि हलके जाणवते.

  • चौथे पाऊल

ताण लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. या युगात बहुतेकच कोणी असेल ज्याला ताण नसेल. कारण तणाव हल्लीच्या लाइफस्टाइलची देणगी आहे. ताण वाढल्यामुळे भूक लागते आणि अती खाण्यात येतं. आणि या उलट ताणामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया कमी होते. परिणामस्वरूप लठ्ठपणा वाढतो.

  • पाचवे पाऊल

नियमित योगद्वारे आपण पोटाची चरबी कमी करू शकता. जसे धनूर आसन आणि पश्चिमोत्थालन आसनद्वारे आपले पोट कमी होईल.

X
COMMENT