आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cough Syrup च्या व्यसनात 5 मुलांनी केला वार्डनसह आणखी एकाचा खून, बाल सुधारगृहातून झाले फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील बाल सुधारगृहात 5 अल्पवयीन मुलांनी वार्डनसह एका 17 वर्षीय मुलाची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कफ सिरपच्या व्यसनात आहारी गेलेल्या या 5 मुलांनी यानंतर बाल सुधार गृहातून पळ काढला. सुधार गृहातून पळून जाणाऱ्या मुलांपैकी एक संयुक्त जनता दलाच्या नेत्याचा मुलगा आहे. तर दुसरा एक मुलगा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे असेही बिहार पोलिसांनी सांगितले आहे. 


कफ सिरपमुळे केले खून...
> पूर्णिया बाल सुधारगृहातील मुलांनी पळून जाण्यापूर्वी आधी एका 17 वर्षीय मुलाचा यानंतर एका वार्डनचा गोळ्या घालून खून केला. परंतु, बालक सुधारगृहात बंदूक आलीच कशी याचा शोध आता पोलिस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल सुधारगृहाच्या वार्डनने मंगळवारी तपास करताना काही मुले कफ सिरपचे व्यसनी झाल्याचे उघडकीस आणले होते. सोबतच, काही मुलांच्या खोल्यातून त्यांनी कफ सिरपच्या बाटल्या सुद्धा जप्त केल्या होत्या. 
> बिजेंद्र कुमार असे नाव असलेल्या त्या वार्डनने यानंतर स्थानिक बाल हक्क आणि न्याय मंडळात या संदर्भात तक्रार दाखल केली. सोबतच, सुधारगृहातील 5 जणांच्या चौकशीची विनंती केली. त्या चौकशीला मंडळाने बुधवारीच मंजुरी दिली होती. या घटनेची माहिती जेव्हा त्या 5 मुलांना मिळाली, तेव्हा त्यांनी कुमारला गोळ्या घालून ठार मारले. यानंतर 17 वर्षीय मुलाची देखील हत्या केली. तो मुलगा कथितरित्या वार्डनच्या सांगण्यावरून या मुलांची हेरगिरी करत होता. कफ सिरपची माहिती त्यानेच वार्डनला दिली असे त्या मुलांना वाटले होते. 
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुले पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गार्डने मुख्य द्वार लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला बंदूकीचा धाक दाखवून गेट उघडण्यासाठी विवश केले आणि पसार झाले. या घटनेचा एफआयआर दाखल करण्यात आला असून सविस्तर तपास सुरू आहे. सोबतच, त्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे.

बातम्या आणखी आहेत...