आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- गुजरातच्या मेहसाणा येथे राहणाऱ्या ७१ वर्षीय खेमजी प्रजापती भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु अशा गरीबी परिस्थितीत व गंभीर आजार झालेला असूनही त्यांनी आपल्या अडचणी बाजूला ठेवून केरळ पूरग्रस्तांना ५ हजारांची मदत दिली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी लागणाऱ्या औषधोपचाराचा खर्च भागवणे त्यांना कठीण जाते. पण आपल्या औदार्याचा आणि मनाच्या श्रीमंतीचे आदर्श उदाहरण त्यांनी लोकासमोर ठेवले आहे. भीक मागून आणलेली रक्कम त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच सुपूर्त केली. खिमजी प्रजापती यांना आपणास कॅन्सर झाल्याचे तीन महिन्यापूर्वीच समजले होते. ते म्हणाले, केरळमध्ये पूर आल्यानंतर तेथील लोकांची दुर्दशा माझ्या कानावर आली होती. ते एेकून मला खूप वाईट वाटले. गरजवंताना मदत केल्याने मला खूप समाधान वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.