आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील वन क्षेत्रात दाेन वर्षांत ५ हजार चौरस कि.मी. वाढ, एकूण वनक्षेत्र आता एक चतुर्थांश झाले; कार्बन शाेषण क्षमतेत २१% वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिरुद्ध शर्मा 

नवी दिल्ली - हवामान बदलाच्या संदर्भात ही बातमी खरच आनंद देणारी आहे. गेल्या दाेन वर्षांत देशातल्या वनक्षेत्रात ५,१८८ वर्ग कि.मी.ची वाढ झाली आहे. विशेष गाेष्ट म्हणजे यामध्ये १,१२० वर्ग कि.मी. घनदाट जंगल आहे. त्याचबराेबर देशाच्या भाैगाेलिक क्षेत्रातील वनांचा वाटा वाढून जवळपास २५ % झाला आहे. २०१७ मध्ये जंगलात ४६६ वर्ग कि.मी. वाढ झाली हाेती. या वर्षी ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक वनक्षेत्रात वाढ झाली त्यामध्ये कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, जम्मू-कश्मीर व हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. राजस्थानच्या मरुस्थळी क्षेत्रात वनांची संख्या वाढली आहे. पूर्वाेत्तर आसाम तसेच त्रिपुरा साेडून सर्व राज्यांमध्ये वन क्षेत्र घटले असल्याचे साेमवारी प्रसिद्ध झालेल्या भारताची जंगल स्थिती - २०१९ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हे १६ वे सर्वेक्षण आहे.इस्रोच्या आयआरएस रिसाेर्ससॅट- २ ने  २०१७ च्या आॅक्टाेबर ते डिसेंबर दरम्यान झालेल्या २० हजार वर्ग कि.मी. क्षेत्रांच्या ३०६ दृश्यांच्या माध्यमातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात वनक्षेत्रात झालेल्या वाढीनुसार कार्बन उत्सर्जनाचा देखील अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार २०१७ च्या तुलनेत हा ४.२६ काेटी टन जास्त आहे. याचा अर्थ वर्षाला २१.३ % वाढ हाेत आहे, जी ७.८१ काेटी टन कार्बन डायाॅक्साईडच्या समतूल्य आहे.याचा अर्थ आपली जंगले वर्षाला २१.३ % जास्त कार्बन शाेषून घेतात. पॅरिस करारानुसार भारताने २०३० पर्यंत ३५ % पर्यंत कार्बन स्टाॅक विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले हाेते. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, वनांत वाढ हाेणारे जगात निवडक देश आहेत. भारत त्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात दरवर्षी आंबा, बाेर, डाळिंब यांची एक काेटी झाडे लावण्याच्या याेजनेमुळे ते वन क्षेत्रात वाढ हाेत आहे.डोंगर-पठारावरील जंगलात वाढ

  • बांबू वन क्षेत्रात ३,२२९ वर्ग कि.मी. वाढले. मध्य प्रदेशातील सर्वात माेठे बांबू क्षेत्र एकूण क्षेत्राच्या १२.५ % झाले आहे.
  • देशाच्या १४० डाेंगराळ जिल्ह्यातील वन क्षेत्रात ५४४ वर्ग किमी वाढ
  • देशाच्या २१८ आदिवासी जिल्ह्यात वन क्षेत्रात ७४१ वर्ग कि.मी. वाढ 218 आदिवासी
  • जंगलात आग लागण्याची शक्यता २१ %
बातम्या आणखी आहेत...