आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम आरोग्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील.

  • आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय

१. आहार : दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटकतत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.

२. स्वच्छता : आहार घेताना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवण बनवताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उद्भवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

३. करमणूक : मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ्य लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी करमणुकीच्या गोष्टी करा.

४. व्यायाम : नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दुसरा मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

५. विश्रांती : विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्य वेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्या वेळी योग्य विश्रांती घ्या.

बातम्या आणखी आहेत...