आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अवश्य टाळाव्या या गोष्टी, अन्यथा वाढू शकते वजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अनेक बदल होतात. याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. जर स्वतःला मेंटेन ठेवले नाही तर या थंडीच्या वातावरणात वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींवर लक्षात असणे गरजेचे असते. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत असेच 5 कारण जे हिवाळ्यात वजन वाढण्यासाठी जबाबदार असतात..

 

1. कमी पाणी पिणे
हिवाळ्यात तहान कमी लागते. यामुळे आपण पाणी कमी पितो आणि जेवण जास्त खातो. यामुळे वजन वाढते. 

 

2. झोप
हिवाळ्यात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. रात्री 9 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने अन्न योग्यप्रकारे पचन होऊ शकत नाही. यामुळे वजन वाढते.

 

3. फिजिकल अॅक्टिविटी
हिवाळ्यात आळस जास्त येतो. यामुळे मॉर्निंग वॉक आणि जिम सारख्या फिजिकल अॅक्टिविटी कमी होतात आणि मेटाबॉलिज्म स्लो होते. यामुळे फॅट बर्न होऊ शकत नाही आणि वजन वाढते.

 

4. तेलकट पदार्थ 
हिवाळ्यात गोड, तळलेले आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. यामुळे बॉडीला हाय कॅलरी मिळतात आणि वजन वाढते.

 

5. व्हायरल फीवर
हिवाळ्यात व्हायरल फीवर झाल्यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होते. यामुळे वजन वाढते.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...