हे 5 शिव / हे 5 शिव मंदिर विज्ञानासाठीही आश्चर्याचा विषय, आपोआप वाढत आहेत शिवलिंग

Aug 24,2018 12:03:00 AM IST

भारतामध्ये अनेक चमत्कारिक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक विशेष मान्यता आहे, परंतु उत्तर-प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेशातील एक-एक शिव मंदिर असे आहे, जे आपल्या चमत्कारामुळे विज्ञानासाठीसुद्धा आश्चर्याचा विषय ठरले आहेत. या पाच मंदिरांमध्ये एक कॉमन विशेषतः म्हणजे या पाचही शिवलिंगाचा आकार आपोआप वाढत आहे. या सर्व शिवलिंगाची मान्यता आणि कथा वेगवेगळी आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे पाच शिवलिंग...


1. पौडीवाला शिव मंदिर (नाहन, हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशातील नाहनपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर पौडीवाला शिव मंदिर आहे. या मंदिराचा संबंध रावणाशी असल्याचे मानले जाते. रावणाने या शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. याला स्वर्गाची दुसरी पौडी नावानेही ओळखले जाते. मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला हे शिवलिंग एक गव्हाच्या दाण्याएवढे वाढते. या शिवलिंगामध्ये साक्षात शिव विराजित असून ते भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.


2. तीळ भांडेश्वर (काशी (वाराणसी), उत्तर प्रदेश)
महादेवाची नगरी काशीमध्ये अनेक प्रसिद्ध शिव मंदिर आहेत. यामधील एक बाबा तीळ भांडेश्वर आहे. मान्यतेनुसार हे सतयुगात प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग आहे. कलियुगापर्यंत हे शिवलिंग तिळाच्या आकाराने वाढत होते. परंतु कलियुगाच्या आगमनानंतर लोकांना चिंता वाटू लागली की, हे अशाचप्रकारे दररोज वाढत राहिले तर संपूर्ण जग या शिवलिंगाच्या सामावले. महादेवाची उपासना केल्यानंतर महादेवाने प्रकट होऊन वर्षातून एकदा फक्त संक्रातीला हे शिवलिंग वाढेल असे वरदान दिले. तेव्हापासून प्रत्येक संक्रांतीला या शिवलिंगाचा आकार वाढतो असे सांगितले जाते.


3. मतंगेश्वर शिवलिंग (खजुराहो, मध्यप्रदेश)
मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मतंगेश्वर शिवलिंगाशी संबंधित मान्यतेनुसार येथे श्रीरामाने पूजा केली होती. 18 फूट उंच असलेले हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकाराएवढे वाढत जात असल्याचे सांगितले जाते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन शिवलिंगाविषयी...

4. मृदेश्वर महादेव (गोध्रा, गुजरात) गुजरातमधील गोध्रा येथील मृदेश्वर महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाच्या आकाराला प्रलयाचा संकेत मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित मान्यता आहे की, ज्या दिवशी हे शिवलिंग मंदिराच्या छताला स्पर्श करेल त्या दिवशी महाप्रलय येईल. शिवलिंगाचा छताला स्पर्श होण्यासाठी लाखो वर्ष लागतील कारण शिवलिंगाचा आकार एक वर्षात एका तांदळाच्या दाण्याएवढा वाढतो. या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे यामधून आपोआप एक जलधारा निघते आणि महादेवाचा अभिषेक करते.5. भूतेश्वर शिवलिंग छत्तीसगढ राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील मरौदा गावातील जंगलात एक नैसर्गिक शिवलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. हे विश्वातील एकमेव नैसर्गिक शिवलिंग मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित एक अनोखे रहस्य याचे महत्त्व आणखीनच वाढवते. रहस्यमय गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची चमत्कारिक पद्धतीने वाढत आहे. प्रत्येक वर्षाला शिवलिंग वाढते 6-8 इंच या शिवलिंगाविषयी लोकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा आणि आस्था आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथे होणारा चमत्कार. हे शिवलिंग आपोआप मोठे होत आहे. हे जमिनीपासून 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. प्रत्येक वर्षी याची उंची मोजली जाते आणि यामध्ये 6 ते 8 इंच शिवलिंग वाढलेले आढळून येते.
X