आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई मला यासाठी माफ कर असे म्हणत 5 वर्षांच्या कँसर पीडित चिमुरड्याने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंकेशायर - इंग्लंडच्या लंकेशायरमध्ये एका 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या कँसरबरोबरच्या संघर्षाने अनेकांचे डोळे पाणावले. 5 वर्षांच्या चार्लीने मृत्यूपूर्वी असे काही म्हटले की, ते ऐकणारेही रडू लागले. जणू त्याला मृत्यूची चाहूल लागली असावी. प्रोक्टर कुटुंबात जन्मलेल्या चार्लीला जन्मापासूनच आजारांचा सामना करावला लागला. तो 3 वर्षांचा असताना त्याच्या शरीरात कॅन्सर असल्याचे समजले. पण या चिमुरड्याने हार मानली नाही. त्याने अखेरच्या क्षणी आजारी असल्याबद्दल आणि आईला त्रास दिल्याबद्दल तिची माफी मागितली आणि तिच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. 


आईने फेसबूकवर सांगितले त्या भावनिक क्षणाबाबत 
- चार्लीने 2 वर्षे या जीवघेण्या आजाराशी संघर्ष केला. रविवारी रात्री 11 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी चार्लीने त्याच्या आई वडिलांबरोबर एक फोटो क्लिक केला. त्यात त्याला एंजलप्रमाणे पंख लावून तयार करण्यात आले होते. फोटो काढल्यानंतर चार्लीने त्याच्या आईला इमोशनल होताना पाहिले. त्यावेळी तो म्हणाला यात तुझी नाही माझी चूक आहे. हे म्हटल्यानंतर काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. 
- चार्लीची आई एम्बर या घटनेने पूर्णपणे खचली आहे. रडून रडून तिची अवस्था वाइट झाली आहे. एम्बरने सांगितले की, तिने केलेल्या फेसबूक पोस्टनंतर काही क्षणांतच चार्ली सर्वांना सोडून गेला. 


आमचा आनंदच निघून गेला 
- एम्बरने लिहिले, आमचे जग, आमचा आनंद, आमचा चार्ली, माझा बेस्ट फ्रेंड असलेला माझा मुलगा आता या जगात नाही. एम्बरने या भावून पोस्टमध्ये पुढे लिहिले, तो माझ्या कुशीत शांतपणे झोपला, कायमचा. यावेळी त्याचे वडील बॅन यांचा हातही त्याच्यावर होता. तो असा झोपला की पुन्हा त्याचे ते सुंदर हास्य आम्ही पाहू शकणार नाही. चार्ली आम्हाला आयुष्यभराच्या आठवणी देऊन गेला. 
- एम्बरने पुडे लिहिले, चार्ली तू मला आई बनण्याची संधी दिली यासाठी मी तुझी आभारी आहे. तू माझ्यासाठीच नाही तर जगभरातील हजारो-लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेस. तू चिमुरड्या वयात या आजाराशी संघर्ष केला. आम्हाला तुझा अभिमान आहे. मी तुला कायम मिस करेल. मी तुझे अखेरचे शब्द कसे विसरू शकेल, बाळा यात तुझी काहीही चूक नाही. तू निराश होऊ नकोस. 


पैसे जमवत होते 
डॉक्टर्सने सांगितले की, चार्लीला कॅन्सर ट्यूमर असल्याने त्याच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत होते. त्याला hepatoblastoma नावाचा आजार होता. त्यामुळे त्याचे लिव्हरही फेल झाले होते. त्याच्या ऑपरेशनसाठी जवळपास 8 कोटी रुपये खर्च येणार होता. कुटुंबाने त्यासाठी निधी जमवणे सुरू केले होते. पण त्याआधीच चार्लीने अंतिम श्वास घेतला. 

 

पुढील स्लाइड्सवर फोटोंतून पाहा चार्लीच्या जीवनातील संघर्ष..

 

बातम्या आणखी आहेत...