आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांच्या मुलीला घरात उचलून नेले, तोंड दाबून केला बलात्कार; 5 मुलांचा बाप निघाला नराधम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुमला (झारखंड) - एका नराधमाने गुरुवारी सायंकाळी माणुसकीला काळीमा फासत एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी नराधमाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी चरकू उराव याला तुरुंगात डांबले आहे. असे म्हटले जाते की चरकू उराव स्वतः पाच मुलांचा बाप आहे.

 

तोंड दाबून केला बलात्कार
संबंधीत घटनेबाबत कुरुमगड पोलीस ठाण्यात चरकूविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. असे म्हटले जाते की गुरुवारी सायंकाळी मुलगी आरोपीच्या घराजवळ खेळत होती. दरम्यान, आरोपीने एकट्या मुलीला घराबाहेर खेळताना पाहून तिला फूस लावून घरात घेऊन गेला. तिथे मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली.

 

आजीला सांगितली आपबीती
घडलेल्या प्रकारानंतर पीडिता रडत तिच्या घरी गेली. घरात आजी एकटीच होती. आजीने तिला रडण्याचे कारण विचारताच मुलीने घडलेला सर्व प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर आजीने शेतात काम करणाऱ्या तिच्या आई-वडीलांना घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर गावकऱ्यांना घडलेला प्रकार समजताच त्यांनी आरोपी चरकू उराव याला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

धर्म प्रजारक होता आरोपी 
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दुष्कर्म करणारा आरोपी चरकू उराव धर्म प्रचारक पास्टरचे काम करत होता. गेल्या पाच वर्षांपासून कुरूमगड येथे भाड्याच्या घरात रहात होता. चरकू धर्म परिवर्तनाचे काम करत होता.

 

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न - पोलिस अधीक्षक
या प्रकरणासंबंधी पोलिस अधीक्षक अंशुमान कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची पोलिस खोलवर तपासणी करत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस विशेष प्रयत्न करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...