आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 year old Girl, Who Was Sleeping On The Side Of Road With Her Parents, Was Murdered After Being Raped

आई-वडिलांसोबत रस्त्याकिनारी झोपलेल्या 5 वर्षीय चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरीरावर अनेक जखमा असलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

महू(मध्यप्रदेश)- येथे एका पाच वर्षीय चिमुकीलचा अपहरणानंतर बलात्कार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत रस्त्याकिनारी झोपलेल्या चिमुकलीला नराधमाने झापेत असताना उचलून नेले. सोमवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळला, तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. दुसऱ्या एका घटनेतसीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला महूमधील नराधम

महूमधील कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे गेले, थोड्या वेळानंतर सूचना मिळाली की बंगला नंबर-122 च्या पडीक जागेमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. पोस्टमॉर्टम करणारे डॉ. महेश मोहबियाने सांगितले की मुलीवर बलात्कार केल्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...