आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोशियारपूर(पंजाब)- 25 ऑक्टोबर 2018 माहिलपूरजवळील गावात 34 वर्षीय आरोपीने 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. हे कृत्य करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीचा सख्खा मामा आहे. चिमुकलीच्या आई-वडिलांनी पंचायतीत याबाबत न्याय मागितला पण कोणतीच मदत मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुलीच्या साक्षीवरून एस.आय. नीलम कुमारी यांनी आरोपी हरप्रीत सिंग उर्फ हनीच्या विरोधत एफआयआर दाखल केली.
तक्रार करून पाच महिने उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. आता चिमुकलीची आई कोटफतूही आणि माहिलपूर ठाण्यात रोज चकरा मारत आहे. आईने आरोप लावला की, पोलिस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत.
मी प्रकरणाची रिपोर्ट परत मागितली आहे: एस.एस.पी.
प्रकरण गंभीर आहे, पीडित मुलीच्या आईने न्याय मिळ्याची मागणी केली आहे. मी या प्रकरणाची फाइल मागितली आहे आणि या प्रकरणात मी स्वत:लक्ष घालणार आहे. आरोपीवर कडक कारवाई केली जाईल.
-जे. ईलनजेचियन, एस.एस.पी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.