आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 5 Years After Sensex, Biggest Jump Of 3.75% After 8 Months, Nifty Up 3.69% In 10 Years

सेन्सेक्सची ५ वर्षे ८ महिन्यांनंतर ३.७५%ची सर्वात मोठी झेप, निफ्टीची १० वर्षांनी ३.६९%ची उसळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली - एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळण्याच्या संकेताने सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली. सेन्सेक्स १४२१.९० अंकांच्या (३.७५%) तेजीसह ३९,३५२.६७ वर बंद झाला.  यापूर्वी १० सप्टेंबर २०१३ रोजी सेन्सेक्समध्ये ७२७.०३ अंकांची (३.७७ %)  वाढ झाली होती. निफ्टीतही १० वर्षांनंतर सर्वात मोठी वाढ झाली. निफ्टी ४२१.१० अंकांच्या वाढीसह ११८२८.२५ या विक्रमी पातळीवर बंद झाला. 

 

बँकांसह ६६ शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर 
एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, डीसीबी, फेडरल बँक, बजाज फायनान्स, एसआरएफ, टायटन व पीव्हीआरचेे शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आले. १५१ शेअरनी वर्षाचा नीचांक गाठला.

 

एक्सपर्ट व्ह्यू : सुधारणेच्या आशेने बाजारात तेजी 
आनंद राठी शेअर्स अँड ब्रोकर्सचे विश्लेषक रिषभ मारू म्हणाले - मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास सुधारणांची प्रक्रिया सुरूच राहील. यामुळे वित्तीय समभागांची खरेदी वाढली.

 

बातम्या आणखी आहेत...