आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - भारताची सर्वात लहान तिरंदाज 5 वर्षीय चुरुकुरी डॉली शिवानी हिने नुकतेच तिरंदाजीमध्ये दोन विक्रम रचले. इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशियन बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद करण्यात आली.
2015 मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षापासून शिवानी भारतातील सर्वात तरुण तिरंदाज बनली होती. त्यावेळी तिने पाच आणि सात मीटर अंतरावरून लक्ष्य साधत 200 गुणआंची कमाई केली होती. पहिल्याच प्रयत्नान तिने 103 तीर अकरा मिनीट आणि 19 सेकंदाज 10 मीटरच्या अंतरावरून एका लक्ष्यावर मारले होते. दुसऱ्या प्रयत्नात तिने आठ सेकंदांमध्ये वीस मीटर अंतरावरून लक्ष्य साधत विक्रम नावावर केले.
शिवानी आता 2024 ऑलिम्पकसाठी सज्ज आहे. ती आंध्रप्रदेशच्या विजयवाडामध्ये वोल्गा तिरंदाजी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेते. तिला कुटुंबाकडून तिरंदाजीचा वारसा आहे. तिचे वडीलही एक आंतरराष्ट्रीय तिरंदाजी कोच होते. एका कार अपघातात त्यांचे निधन झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.