Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 5 yogasana for Asthma dama

दम्याच्या आजारापासून दूर ठेवतील ही पाच योगासने

हेल्थ डेस्क | Update - Sep 10, 2018, 10:21 AM IST

दम्याच्या रुग्णांसाठी योगासने अत्यंत लाभदायक मानली गेली आहेत. आपल्या नियमित दिनचर्येत या सोप्या याेगासनांचा समावेश केल्य

 • 5 yogasana for Asthma dama

  दम्याच्या रुग्णांसाठी योगासने अत्यंत लाभदायक मानली गेली आहेत. आपल्या नियमित दिनचर्येत या सोप्या याेगासनांचा समावेश केल्याने दम्याशी संबंधित आजारांना दूर करण्यात मदत मिळते.


  प्राणायाम
  प्राणायाम करणे सोपेही आहे आणि हे दम्याच्या रुग्णांसाठी अत्यंत लाभदायकही आहे. हे केल्याने फुफ्फुसांमध्ये सुधारणा होते आणि श्वास घेण्याची समस्या दूर होते. प्राणायामाने मनही शांत राहते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार आसनांविषयी...

 • 5 yogasana for Asthma dama

  भुजंगासन 
  हे केल्याने छाती रुंद होते. यामुळे फुप्फुसे चांगल्याप्रकारे काम करतात. तसेच यामुळे रक्त प्रवाहदेखील सुधारतो. भुजंगासन िनयमित केल्याने लवकरच या रोगापासून मुक्ती मिळू शकते. 

 • 5 yogasana for Asthma dama

  अर्धमत्स्येंद्रासन 
  हे आसन दररोज केल्याने कंबर, मान, पाय, पाठ आणि छातीच्या नसांमध्ये ताण निर्माण होतो. यामुळे फुफ्फुसे खुलतात. श्वसन प्रक्रियेचा वेग वाढतो. दमा दूर करण्यामध्ये हे आसन अत्यंत फायद्याचे आहे.

 • 5 yogasana for Asthma dama

  बध्धाकोनासन 
  बध्धाकोनासन केल्याने मन खूप शांत राहते. हे केल्याने स्नायूंचा व्यायाम अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो. श्वसनक्रियेचा वेगही वाढतो आणि फुफ्फुसांनाही याचा फायदा मिळतो. यामुळे हार्ट रेटदेखील कमी होतो. 

 • 5 yogasana for Asthma dama

  मत्स्यासन 
  तुम्हाला थॉयराइडचा त्रास असेल तर हे आसन फायद्याचे आहे. शरीराचा माशासारखा आकार बनवून केल्या जाणाऱ्या या आसनामुळे घशामध्ये तणाव निर्माण होतो. त्याच्या मदतीने थायरॉइड ग्रंथी आणि श्वासनलिका खुलते व श्वास घेण्यामध्ये त्रास होत नाही. 

Trending