आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50-50 चा जो फॉर्म्युला ठरला होता आणि आताही तोच प्रस्ताव आहे, संजय राऊतांनी खोडून काढले भाजपचे दावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व निर्णय झाले असून, लवकरच गोड बातमी मिळेल  आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे दावे खोडले आहेत. भाजपचे दरवाजे खुले, खिडक्या उघड्या, दाराला फटी. कुणी कशातून घुसायचं हा प्रश्न राहिलाच नाही. ते प्रस्ताव मिळाला नाही असं म्हणत आहेत. यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 50-50 चा जो फॉर्म्युला ठरला होता तोच प्रस्ताव आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.भाजपकडून आम्ही शिवसेनेला प्रस्ताव पाठवला आहे. त्यांच्यासाठी सर्व दारं खुले आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भाजपने आज फार समंजसपणे वक्तव्यं केलं आहे. पण, प्रस्ताव तोच आहे जो ठरला होता. ठरल्याप्रमाणे 50-50 चा प्रस्ताव होता. त्यापेक्षा अधिक काहीही नको. भाजपचे दरवाजे खुले, खिडक्या उघड्या, दाराला फटी. कुणी कशातून घुसायचं हा प्रश्न राहिलाच नाही. ते प्रस्ताव मिळाला नाही असं म्हणत आहेत. यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 50-50 चा जो फॉर्म्युला ठरला होता तोच प्रस्ताव आहे." असे राऊत यांनी सांगितले.

चर्चेसाठी सर्व दारं खुले- चंद्रकांत पाटील
 
भाजपच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "शिवसेनेनं अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही."

बातम्या आणखी आहेत...