Home | International | Other Country | 50 feet robot make for a show in france millions of people gathered to see

रस्त्यावर चालताना दिसला 50 फुट उंच रोबोट, 45 फुट उंच स्पायडर.. बघण्यासाठी 6 लाख लोकांनी केली गर्दी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 05:49 PM IST

हॉलीवुडच्या फिल्म सेट पेक्षा कमी नव्हता हा रियल सीन

  • पॅरिस : फ्रान्समधील टूलूझ (Toulouse)शहरात, गेल्या चार दिवसांपासून लोक एक अद्वितीय पौराणिक नाटकाचा शो पहात आहेत. या शोचे मुख्य आकर्षण मानवी कलाकार नसून 50 फूट लांबीचे रोबोट आहे. शोच्या स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनानुसार शहराच्या रस्त्यावर 45 टन पेक्षा जास्त वजनाचे रोबोट सादर केले गेले. फक्त चार दिवसांत देशभरातील 6 लाख लोक नाटक पाहण्यासाठी आले. यावरून फ्रान्समधील या महान कार्यक्रमाची लोकप्रियता किती आहे हे समजू शकते.

    फ्रान्सच्या ऐतिहासिक 'गार्डियन ऑफ द टेंपल' नाटकाला मशिनीया कंपनीने सामान्य लोकांमध्ये प्रदर्शित केले आहे. विशेषबाब म्हणजे कंपनीने स्वखर्चाने रोबोट्स तयार केले आहेत. 50 फुटांचे प्रचंड रोबोट तयार करण्यासाठी कंपनीला 15 लाख युरो (सुमारे 124 कोटी रूपये) खर्च आला होता. शोचे प्रदर्शन करण्यासाठी टूलूझ (Toulouse)शहराला 4.4 लाख युरो (सुमारे 36 कोटी रूपये) खर्च करावा लागला. याशिवाय, 45 फूट रोबोट स्पायडरला शोमध्ये मुख्य पात्र करण्यात आले.

    शहराच्या संग्रहालयात ठेवणार रोबोट्स
    पौराणिक शो संपल्यानंतर कंपनी टूलूझ (Toulouse) मध्ये एक विशेष संग्रहालय बनविण्याच्या तयारीत आहे. या संग्रहालयात पात्र साकारणारे रोबोट् ठेवण्यात येणार आहे. रोबोट ठेवलेल्या जागेला 'हॉल ऑफ मशीन' असे नाव देण्यात येईल. शहराच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, या कार्यक्रमाने जगाला स्वतःकडे आकर्षित केले आहे. अशा परिस्थितीत, पर्यटक अशा प्रकारचे शो पाहण्यासाठी लवकरच टूलूझ (Toulouse) येथे पोहोचतील. या संग्रहालयाद्वारे शहराची कमाई वाढण्यात सहज मदत होऊ शकते. असे मानले जाते की, आगामी काळात काही देश अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रोबोट कंपन्यांशी देखील संपर्क साधतील.

  • 50 feet robot make for a show in france millions of people gathered to see
  • 50 feet robot make for a show in france millions of people gathered to see

Trending