Home | Business | Gadget | 50 lakh indian buyers of mi smartphone with 4000mAh battery and 3 cameras

भारतात 50 लाख लोकांनी खरेदी केला आहे Mi चा हा स्मार्टफोन, 3 कॅमेरे आणि 4000mAhची दमदार बॅटरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 13, 2018, 01:41 PM IST

या फोनची किंमत 14999 आहे. आधी हा स्मार्टफोन हा स्मार्टफोन फ्लॅश सेलमध्ये विक्री होत होता. पण आता कधीही खरेदी करता येतो.

 • 50 lakh indian buyers of mi smartphone with 4000mAh battery and 3 cameras

  गॅझेट डेस्क - चीनची कंपनी श्याओमी (Mi)चे स्मार्टफोन भारतात लोकांच्या पसंतीला उतरले आहेत. कंपनीचा Redmi Note 5 Pro भारताचा मोस्ट पॉप्युलर हँडसेट बनला आहे. Mi ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या फोनचे 50 लाख युनिट विकले गेले आहेत. ड्युअल कॅमेरा असलेला हा भारतातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरला आहे. या फोनची किंमत 14999 आहे. आधी हा स्मार्टफोन हा स्मार्टफोन फ्लॅश सेलमध्ये विक्री होत होता. पण आता हा फोन कधीही खरेदी करता येऊ शकतो.


  3 कॅमेरे असलेला स्मार्टफोन
  Redmi Note 5 Pro मध्ये 12MP + 5MP कॉम्बिनेशनचा ड्युअल रियर कॅमेरा आहे. हा इलेक्ट्रिक इमेज स्टॅबलायझेशन (EIS) सारखे फिचर्स यात आहेत. यात 12MP कॅमेरा ऑब्जेक्टवर तर 5MP कॅमेरा बॅकग्राउंडवर फोकस करतो. याचा फ्रंटकॅमेरा 20MP आहे. यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी आहे. मेमरी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत एक्सटेंडेबल आहे.


  Redmi Note 5 Pro चे इतर फिचर्स
  >> 5.99 इंच Full HD डिस्प्ले, 18:9 रेशो सपोर्ट
  >> 4000mAh Li पॉलिमर बॅटरी
  >> Qualcomm Snapdragon 636 प्रोसेसर
  >> Wi-Fi 802.11, WiFi Direct, Bluetooth 5.0, FM radio, Infrared पोर्ट
  >> हा फोन कोणत्याही डिव्हाइसच्या रिमोटप्रमाणेही वापरता येतो.


  या फोनबरोबर स्पर्धा..
  भारतात विक्रीर होणाऱ्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी सेगमेंटमधील Redmi Note 5 Pro बेस्ट आणि बजेट स्मार्टफोन आहे. दुसरीकडे Oppo F7 (4GB RAM + 64GB) ची किंमत 19990 रुपये, vivo V9 (4GB RAM + 64GB) ची किंमत 20990 रुपये आणि Asus Zenfone Max Pro M1 (4GB RAM + 64GB) ची किंमत 12999 रुपये आहे.

Trending