आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथ / पुराचे दृश्य चित्रीत करण्यासाठी झाला 50 लाख लीटर पाण्याचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला 2013 मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या महापुराची पार्श्वभूमी आहे. एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलाची प्रेमकहाणीही या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहे. चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने यात्रेकरुंना पाठीवर बसवून केदारनाथचे दर्शन घडवणा-या तरुणाची भूमिका वठवली आहे. तर साराने हिंदू मुलीची व्यक्तिरेखा साकारली असून तिच्या प्रेमात सुशांत पडतो. अभिषेक कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटातील पुराचे दृश्य चित्रीत करण्यासाठी 50 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. 

 

50 लाख लीटर पाण्याचा वापर: सूत्रांनुसार, या चित्रपटातील पुराचे दृश्य चित्रीत करण्यासाठी 470 वॉटर टँकर्सचा वापर करण्यात आला. या टँकर्समधील पाणी खोपोली येथे बनवलेल्या एका मोठ्या वॉटर टँकमध्ये (मोठ्या स्वीमिंग पूलसारखा टँक) टाकण्यात आले. हे ठिकाण  मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. प्रत्येक टँकरमध्ये 10 हजार लीटर पाणी होते. या टँकमध्ये केदारनाथचा सेट बनवण्यात आला होता.

 

या चित्रपटांसाठीही झाला लाखो लीटर पाण्याचा वापर...


माय नेम इज खान
करण जोहरच्या माय नेम इज खान या चित्रपटासाठी 200 वॉटर टँकर्सचा वापर करण्यात आल होता. चित्रपटातील पुराच्या दृश्यासाठी 24 लाख लीटर पाणी वापरण्यात आले होते. 

 

तुम मिले
महेश भट यांच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या तुम मिले या चित्रपटात मुंबईतील पुरस्थिती दाखवण्यासाठी 200 टँकर्स पाणी मागवण्यात आले होते. 


दे दना दन
2009 मध्ये रिलीज झालेल्या प्रियदर्शनच्या दे दना दन या चित्रपटातील क्लायमॅक्सचे त्सुनामी दृश्य चित्रीत करण्यासाठी 700 टँकर्स पाणी वापरण्यात आले होते. या सिक्वेन्ससाठी 84 लाख लीटर पाण्याचा वापर झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...