आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 50 People Died In Nepal Floods, 10 Flood Floods In Bihar, Deployed 12 Teams Of NDRF

नेपाळच्या पुरात ५० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १० जिल्ह्यांत पूर, एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - नेपाळ, बिहार व ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती पुरामुळे गंभीर बनली आहे. नेपाळमध्ये पाऊस व दरडी कोसळल्याने मृतांची संख्या ५० च्या घरात गेली. २५ लाेक जखमी तर ३५ बेपत्ता आहेत. पुरामुळे १० लाखांहून जास्त लोकांना फटका बसला. नेपाळमधील गंडक, बागमती, बुढी गंडक, लालबाकिया, कमला बलान, भूतही बलान, कोसी व महानंदेची पाणी पातळी वाढली. त्यामुळे पूर्व व पश्चिम चंपारण, कटिहार, मुजफ्फरपूर, सहरसा, सुपौल, भागलपूर, पूर्णियासह १० जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली.बिहारमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात असून १० तुकड्या सतर्क ठेवले आहे.

 

त्रिपुरामध्ये  पूर, राजधानीतील लोकांना ३० निवाऱ्यांत हलवले

आसामच्या २५ जिल्ह्यांवर पुराचे संकट आहे. अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. ५० हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. पुरामुळे १४ लाख लोकांवर प्रभाव पडला आहे. एनडीआरएफच्या १२ तुकड्या, सैन्य, एसीडीआरएफचे जवान बचाव कार्यात सक्रिय आहेत. त्रिपुराची राजधानी आगरतळाला पुराने वेढले आहे. अनेक भागात संपर्क तुटला आहे. लोकांना ३० निवाऱ्यांत हलवण्यात आले आहे.