आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीला कंटाळून राज्यातील 50 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू शिवजयंतीच्या दिवशी पुरस्कार परत करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांगली महानगरपालिकेने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना मनपात थेट नियुक्ती दिलेली आहे

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देशासाठी पदके जिंकणाऱ्या व उच्च दर्जाच्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. मात्र, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारणी नोकरी मिळत नाही, त्यामुळे येत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपला पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.


निवेदनात म्हटले आहे की, मध्य प्रदेशात खेळाडूंना विक्रम पुरस्कार देण्यात येतो, त्याबरोबर शायकीय सेवेची नियुक्ती पत्रे देखील देतात, महाराष्ट्रात असे होत नाही. सांगली महानगरपालिकेने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना मनपात थेट नियुक्ती दिलेली आहे. त्या आधारे औरंगाबाद, पुणे, अमरावती आदी मनपांनी तसा ठराव संमत करून घेतला. मात्र, त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही केली जात नाही. खेळाडूंना नोकरीची गरज असताना बेरोजगार म्हणून दिवस काढावे लागत आहे. राज्यस्तरीय पदक विजेत्याला शासन थेट नोकरी देते, तर आम्हा पुरस्कार विजेत्यांना काय नाही. येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत आमच्या मागणीचा साकारात्मक विचार व्हावा, अन्याथा 10 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा पुरस्कार शासनाला परत करु, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदानावर तलवारबाजीचे पुरस्कार विजेते सागर मगरे, स्नेहा ढेपे यांची स्वाक्षरी आहे. 

संपूर्ण राज्यात मोहित 

पुरस्कार वापसीची संपुर्ण राज्य भरातून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. जवळपास 50 पुरस्कार विजेते आमच्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यात क्रीडा अधिकारी, पुणे संचालनालय, मंत्रालयातील क्रीडा विभागात निवदेन सादर केले आहेत. आम्ही संबधितांना 10 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करू.- सागर मगरे, तलवारबाजी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते.

बातम्या आणखी आहेत...