आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावती मुंबई पावसामुळे थांबली, 40 फोटोंमध्ये पाहा शहराचे हाल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची औद्योगिक राजधानी मुंबई पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहर आणि सबअर्बन परिसरात अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी भरले आहे. सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.


सोमवारी रात्री 10 वाजेपासून मंगळवारी सकाळी 7 पर्यंत एकूण 55 विमानाना डायव्हर्ट करण्यात आले आहे, तर 52 विमानाना रद्द करण्यात आले आहे. पावसाचा परिणाम लोकलवरही दिसला आहे.


मलाडच्या दर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे 
मागील पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
 

बातम्या आणखी आहेत...