आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : महिला अटेंडंटने ५० व्या वाढदिवशी आकाशात विमानाच्या विंगवर केल्या कसरती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - युनायटेड एअरलाइन्सची अटेंडंट सबरिना स्वॅनसनने काही दिवसापूर्वी विमानाच्या विंगवर हवेत चालून दाखवले आणि कसरती केल्या. ही माहिती तिने युनायटेड एअरलाइन्सच्या वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉगवर दिली आहे. फ्रँकफर्टच्या सबरिनाने सांगितले, आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चालण्याची कसरत केली. अाठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये एअरक्राफ्टच्या बाहेर विंगवर काही वेळासाठी उभी होती. आता बोइंग स्टिअरमॅन बी प्लॅनच्या टॉपवर उभी राहिले होते.
सबरिना म्हणते, हवाई कसरती करण्याचे प्रशिक्षण वॉशिंग्टनमध्ये घेतले. सबरिना म्हणाली, विशेषत: माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हवेत विंगवर चालण्याची ही चांगली संधी होती. यासाठी खास प्रशिक्षणही घेतले होते. तो दिवस उजाडला. पायलटसोबत मी उड्डाण केले. एका ठरावीक उंचीवर गेल्यानंतर पायलटने मला पुढे जाण्यास सांगितले, माझी सीट सोडून विंगवर गेले. 


८ हजार फुटांवर चार केबलने बांधले होते
सबरिना म्हणाली, ८ हजार फूट उंचीवर मी खूप उत्साहित होते, पण मनात भीतीही होती. सुरक्षेसाठी मला चार लांब अशा केबलने बांधलेले होते. ही माझ्या आयुष्यातील एक अद््भुत अशी घटना होती. 

बातम्या आणखी आहेत...