आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 50 Years Old JNU Is Second In The Country, Before You Endorse Or Oppose These Eight Issues You Also Read...

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 वर्षे जुने जेेएनयू, देशात दुसऱ्या स्थानी, समर्थन किंवा विरोध करण्याअगाेदर तुम्हीही वाचा हे आठ मुद्दे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शुल्कवाढीच्या विराेधात उग्र अांदाेलन करताना जेएनयूचे विद्यार्थी व त्यांना राेखून धरताना दिल्ली पाेलिस(संग्राहित छायाचित्र) - Divya Marathi
शुल्कवाढीच्या विराेधात उग्र अांदाेलन करताना जेएनयूचे विद्यार्थी व त्यांना राेखून धरताना दिल्ली पाेलिस(संग्राहित छायाचित्र)

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टि्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)च्या यादीत दुसऱ्या स्थानावर असेलेले प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. फी वाढीच्या मुद्याने संपूर्ण देशाचे लक्ष जेएनयूकडे वेधले आहे. दिल्लीत पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. तर वृत्तवाहिन्यांवरही चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावरही दोन्ही बाजूने विचार मांडले जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा विरोध करणारा, तर विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहणारा असे दोन वर्ग आहेत. विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रमोद कुमार यांनी शुल्कवाढीची सूचना जारी केल्यानंतर जेएनयूमधील वाद सुरू झाला आहे. या शुल्कवाढीमुळे आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत की, ज्यांच्या परिवाराचे रोजचे उत्पन्न ४०० रुपये इतके आहे. तर, दुसरीकडे ४० वर्षांनंतर शुल्कवाढ केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. शुल्क न घेतल्यास विद्यापीठाला दर वर्षाला ४५ कोटींचा बोजा सहन करावा लागत आहे. जेएनयू केवळ शुल्कवाढीसाठीच नाहीतर तर याधी देशविरोधी घोषणा देणे, केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करणे यासाठीही चर्चेत आले आहे. आणीबाणीनंतर विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर तत्कालीन कुलपती इंदिरा गांधींना राजीनामा द्यावा लागला होता. अशा वेळी या वादाचे समर्थन वा विरोध करण्यापूर्वी, विद्यापीठ व तथ्यांविषयी जाणून घ्या.

या मुद्यांच्या आधारावर जाणून घ्या जेएनयू आणि निगडीत वाद

जाणून घ्या काय आहे शुल्कवाढीचा वाद?


रजिस्ट्रार प्रमोद कुमार यांनी नोव्हेंबर २०१९ ला परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये देखभाल दुरुस्तीवर वर्षाला १० कोटी रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. इतर विद्यापीठांप्रमाणे येथील विद्यार्थ्यांनाही आता वीज, पाण्यासह अन्य सेवांचे शुल्क भरावे लागेल. १७०० रुपये महिना अशी ही रक्कम आहे. या परिपत्रकामु‌ळेच जेएनयूमध्ये वादाला सुरुवात झाली असून वाद अजूनही सुरूच आहे. विरोधानंतर काही शुल्क कमीही करण्यात आले आहे.

शुल्कात अशी हाेते वाढ


सुविधा - वर्तमान - वाढ - संभाव्य
खाेली भाडे (एकेरी) - 20 - 600 - 300
खाेली भाडे (दुहेरी) - 10 - 300 - 150
पाणी-वीज - निरंक - प्रत्यक्ष - 50%
सेवा शुल्क - निरंक - प्रत्यक्ष - 50%

जेएनयूला विशेष ठरविणाऱ्या काही गोष्टी.... 


जे एनयूवरून सध्या भलेही केवळ वाद हाेत असले तरी अांतरराष्ट्रीय स्तरावर मात्र या संस्थेची काही खास वैशिष्ट्ये अाहेत, जी अन्य संस्थांच्या तुलनेत वेगळी व प्रतिष्ठित बनवणारी अाहेत.
- येथील धाैलपूर वाचनालय २४ खुले असते. पुस्तके घेऊन जाता येत नाही, पण वाचता येतात
- वर्षाला २०० पेक्षा जास्त बिगर शैक्षणिक व्याख्याने, कार्यशाळा हाेतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावंत ज्ञान अाणि अनुभव सांगतात.
- विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाची निवड अमेरिकेतल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या धर्तीवर केली जाते. निवडणूक लढणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष व्यासपीठावरून भूमिका मांडताे. प्रतिस्पर्ध्यांच्या प्रश्नांची उत्तरेही व्यासपीठावरून दिली जातात. विद्यार्थी उमेदवारांना प्रश्न - उत्तरे विचारली जातात. े अध्यक्ष हाेण्याच्या अाधी उमेदवाराला कठाेर परीक्षेला सामाेरे जावे लागते.
- डेहराडूनचे सेना कॅडेट काॅलेज, पुण्याचे सैनिक अभियांत्रिकी विद्यालय, सिकंदराबादचे इलेक्ट्राॅनिक ,यांत्रिकी सैनिक काॅलेज, महूचे दूरसंचार इंजिनिअरिंग काॅलेज, पुण्याची राष्ट्रीय सुरक्षा अकादमी, केरळची भारतीय नाैसेना अकादमी या संरक्षण दलाच्या सहा संस्थांना जेएनयूची मान्यता अाहे.
- दरवर्षी अांतरराष्ट्रीय खाद्य महाेत्सव हाेताे. येथील विदेशी विद्यार्थी त्यांच्या देशातील प्रसिद्ध पदार्थ बनवतात.
- येथे काँग्रेस, भाजप व डावे यांच्या अनुक्रमे एनएसयूअाय, एबीव्हीपी ,अायसा या तीन संस्था कार्यरत अाहेत. परंतु सगळ्यांना अापली भूमिका मांडण्याची समान संधी दिली जाते. येथील विद्यार्थी राजकारणाची राष्ट्रीय स्तरावर चर्चा असते.

हे आहेत जेएनयूशी संबंधित प्रमुख वाद... 


- आणीबाणीनंतर सीताराम येचप्रमुखरी यांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन कुलपती इंदिरा गांधींनी पदाचा राजीनामा दिला होता. येचुरी तेव्हा विद्यार्थी नेते होते.
- २०१६ मध्ये जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्याचे प्रकरण समोर आले आहे. तत्कालीन विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, माजी विद्यार्थी उमर खालिदसह अनेक विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- निर्भया प्रकरणाच्यावेळी जंतर-मंतरवर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये जेएनयू सर्वात महाग


देशातील प्रमुख ५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये जेएनयूमध्ये मेस आणि वसतिगृहाचे शुल्क सर्वाधिक आहे. दिल्ली विद्यापीठाच्या दोन्ही सत्रांचे शुल्क ५५,००० रुपये वार्षिक इतके आहे. तर, जेनयूचे ५६,००० रुपये आहे. जामिया मिलिया इस्लामियाचे शुल्क ३५,०००, तर अलाहाबाद विद्यापीठाचे शुल्क ३०,००० आहे. बनारस विद्यापीठाचे शुल्क २८,००० व अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे १५,००० रुपये आहे.

५० टक्के एससी/एसटी


जेएनयूच्या अहवालानुसार सध्या विद्यापीठात एकूण ८७३२ विद्यार्थी शिक्षण घेतात. यात ४५६२ विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यंत मागासलेले व दिव्यांग प्रवर्गातील आहेत. ३१९२ सामान्य गटातील व ३२८ विद्यार्थी विदेशातील आहेत.

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग बंद हाेतील : योगेंद्र यादव


जेएनयूचे माजी विद्यार्थी व स्वराज इंडियाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष याेगेंद्र यादव यांच्या मते या शुल्कवाढीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचे कुटुंब हा भार सहन करू शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग बंद हाेतील. शुल्कवाढ केवळ जेएनयूचे प्रकरण नाही तर ते सर्व प्रतिष्ठित संस्थांचे प्रकरण अाहे. सरकार पैशाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे मार्ग बंद करत अाहे. संविधानानुसार शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे.

देशात उच्च शिक्षण माेफत करणे शक्य नाही-संजय बारू


अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पुस्तकाचे लेखक व माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांचे शिक्षण जेएनयूमध्येच झाले अाहे. दिव्य मराठीशी बाेलताना ते म्हणाले, शालेय शिक्षण सर्वांसाठी माेफत केले जाऊ शकते, पण भारतासारख्या देशात उच्च शिक्षण माेफत करणे शक्य नाही. सरकारने अचानक शुल्कवाढ करायला नकाे हाेती. ती हळूहळू वाढवली असती तर विद्यार्थ्यांच्या पालकांवर अचानक भार पडला नसता. जेएनयू प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हित जपावे. िद्यापीठाच्या मते अनेक वर्ष शुल्कवाढ झाल्याने त्यांच्यावर अार्थिक बाेजा सातत्याने वाढत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...