आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5000 Muslim Participants To Participate In Ayodhya Rally; Said nothing To Be Afraid

अयोध्येत धर्मसभेत 5 हजार मुस्लिम सहभागी होणार; म्हणाले-घाबरण्यासारखे काही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - अयोध्येत रविवारी विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. विहिंप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदू संघटनांच्या समर्थकांची गर्दी अयोध्येत सातत्याने वाढू लागली आहे. अयोध्येला छावणीचे रूप आले आहे. सुरक्षा दलास तैनात करण्यात आले आहे. अयोध्येतील स्थानिक नागरिकांत त्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. दोन लाखांहून जास्त लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी व मुलगा आदित्यही अयोध्येत दाखल झाले आहेत.

 

अल्पसंख्यांक समुदाय राहत असलेल्या भागांत शांतता आहे. परंतु दबावाखाली येऊन अनेक अल्पसंख्याक इतरत्र गेले आहेत. कोणीही घाबरलेले नाही. कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, असे जिल्हाधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले. अयोध्येत कटरा, सुल्हटिया, मुगलपुरा, सय्यदवाडा, बेगमपुरा, गाडीवाल टोला, बक्सरिया टोला, रायगंज, कनीगंज इत्यादी ठिकाणी अल्पसंख्यांक समुदायाची मोठी वस्ती आहे. 


अयोध्येच्या परिसरातील लोकांकडून आेळखपत्राची तपासणी केली जात आहे. जमावाद्वारे दर्शनाची परवानगीही नाकारण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. वादग्रस्त परिसराला रेड झोन जाहीर केले आहे. बाबरी मशिदीचे पक्षकार हाजी महबूब सांगितले की, बाहेरून येणाऱ्या गर्दीला मुस्लिम घाबरत नाहीत. कारण त्यांना स्थानिक हिंदूंची मदत होते.  राम मंदिर संविधानाच्या चौकटीत राहून होईल, गर्दी जमा करून नव्हे.

 

हनुमान गढीमध्ये मुस्लिमांची फुले, खडावा, ग्रंथ विक्रीची दुकाने सुरू आहेत. अयोध्येतील मंदिरांसाठी मुस्लिम फूल उत्पादकांच्या शेतातून फुले येतात.   मुस्लिमी कारसेवा मंचचे आझम खान म्हणाले, पाच हजार मुस्लिम धर्मसभेत सहभागी होतील. मंदिराचे पक्षकार धर्मदास म्हणाले, प्रकरणाच्या रोज सुनावणीसाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाईल. श्रीराम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य डॉ. रामविलास वेदांती म्हणाले, धर्मसभा मंदिर बनवण्यासाठी आहे. गर्दी जमवणे असा उद्देश नाही. विहिंपचे संघटन मंत्री अंबरिश कुमार म्हणाले, मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय जाणूनबुजून विलंब करत आहे. भक्तमाल आश्रमचे महंत अवधेशदास म्हणाले, आपल्यावर अन्याय झाला ही गोष्ट आता हिंदुंना समजली आहे. 

 

योगींचे मंत्री : १४४ असताना गर्दी वाढतेय, सैन्य बोलवा
अयोध्येत सैन्य तैनात केले पाहिजे. कलम १४४ लागू असतानाही लोंढे येत आहेत. शिवसेना व विहिंपचा कार्यक्रम पाहता सैन्य तैनात केले पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी योग्य खबरदारी घेतली पाहिजे.
-आे. पी. राजभर, योगी सरकारचे मंत्री

 

गडबडीचे पुरावे मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ
अयोध्येत गडबडीचे काही पुरावे मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ. यासंबंधी पोलिस महासंचालक, गृह सचिव व प्रधान सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. अयोध्येत समर्थकांची गर्दी हा रणनीतीचा भाग आहे. भाजप या मुद्द्यावर गंभीर नसल्याचे शिवसेना पाहतेय. 
- जफरयाब जिलानी, मुस्लिम पक्षाचे वकील.

 

मंदिरासाठी कायदा करा
लोकांच्या संयमाचा बांध फुटण्याआधी सरकारने राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा.

-बाबा रामदेव, योग गुरू

बातम्या आणखी आहेत...