आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान करण्यासाठी भरपावसात जमले 5000 लाेक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या बर्मिंगहॅममध्ये जाेरदार पाऊस सुरू असताना ५ हजार लाेक रांगेत उभे हाेते. अर्थातच हे सारे काेणत्या रॅलीत सामील हाेण्यासाठी किंवा काेणती माेहीम चालवण्यासाठी आलेले नव्हते, तर पाच वर्षे वयाच्या एका मुलाच्या शाळेबाहेर ते सारे रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येताे याची प्रतीक्षा करीत हाेते. हे सारे लाेक ५ वर्षांच्या आॅस्कर सेक्सल्बी-ली यास रक्त आणि स्टेम सेल देण्यासाठी गाेळा झाले हाेते. 


आॅस्कर लिम्फाेब्लास्टिक ल्युकेमिया नावाच्या दुर्लभ कर्कराेगाशी झुंजत आहे. त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डाॅक्टरांनी तीन महिने याेग्य उपचार हाेऊ शकले तर त्यास जीवदान मिळू शकेल असे सांगितले आहे. बर्मिंगहॅम बाल रुग्णालयातील डाॅक्टरांच्या मते, जर तीन महिन्यांत त्यास स्टेम सेल डाेनर मिळाला नाही तर त्याचे प्राण वाचू शकणार नाही. डाॅक्टरांच्या या निर्वाळ्यानंतर आॅस्करचे आई-वडील आेलिविया सेक्सल्बी आणि जॅमी सेक्सल्बी यांनी आॅस्करसाठी मानवी साखळीचे अभियान सुरू केले. अशाच स्वरूपाचे अभियान आॅस्करच्या शाळेने बर्मिंगहॅममध्ये सुरू केले आहे. या प्रकरणाची माहिती जशी लाेकांना कळाली त्यापाठाेपाठ ४,८५५ जण रक्तदानासाठी तयार झाले. 


हे सारे लाेक भर वादळी पावसात आॅस्करच्या शाळेबाहेर रांगेत वाट पाहत उभे हाेते, आॅस्करशी आपला स्टेम सेल मॅच व्हावा हीच त्यांची इच्छा हाेती. त्यानंतर पिटमास्टाेन प्राथमिक शाळेने ट्विट करताना म्हटले, आॅस्करच्या मदतीसाठी धावून आलेल्या हजाराे लाेकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत. आम्ही ४ हजार ८५५ स्टेम सेल दात्यांची नावे नाेंदवली आहेत. अपेक्षा आहे की, आॅस्करची प्रकृती लवकर तंदुरुस्त व्हावी आणि ताे घरी परत यावा. 

बातम्या आणखी आहेत...