आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ताधारकासाठी महापालिकेला 51 लाखांचा फटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील मालमत्ताधारकाने बेटरमेंट चार्जेस भरल्यानंतरही काम न झाल्याने दाखल दाव्यात खंडपीठाने पैसे भरण्याचे अादेश दिले हाेते; परंतु मालमत्ताधारकाला फायदा व्हावा म्हणून थेट दाेन वर्ष फाइल दडपून ठेवल्यामुळे महापालिकेला तब्बल ५१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार थेट शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात अाली अाहे. 

 

चाैकशी हाेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात अाली अाहे. याचसंदर्भात विराेधी पक्षनेत्यांनी अायुक्तांना पत्र देऊन चाैकशीची मागणी केली अाहे. शहरातील एका मालमत्ताधारकाने नगररचना विभागात बेटरमेंट चार्जेस भरले हातेे; परंतु नगररचना विभागाने त्यांचे काम न केल्याने मालमत्ताधारकाने सन २०१३-१४ मध्ये अाैरंगाबाद खंडपीठात दावा दाखल केला हाेता. त्यात न्यायालयाने पालिकेला अादेश करून मालमत्ताधारकाला १७ लाख रुपये देण्याचे अादेश केले हाेते; परंतु त्यानंतरही पालिकेने ती रक्कम अदा केली नाही. या वेळी सुभाष मराठे हे विधी शाखेत लिपिक हाेते. न्यायालयातील दाव्यासंदर्भातील फाइल त्यांनी त्याच्याच कपाटात दीड ते दाेन वर्ष ठेवल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. त्यामुळे न्यायालयाने महापालिकेस सन २०१७ मध्ये ५१ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे अादेश केले हाेेते. मराठे यांनी मालमत्ताधारकास लाभ व्हावा म्हणून हे काम केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात अाले अाहे. 


तत्कालीन अायुक्त जीवन साेनवणे यांनी मालमत्ताधारकास त्वरित ५१ लाख रुपये देण्याचे अादेश दिले. रक्कम देण्यापूर्वी स्थायी समिती व महासभेची मंजुरी घेतली नाही. महापालिकेचे हित लक्षात घेता सर्वाेच्च न्यायालयात अपिल दाखल करता अाले असते; परंतु तसे केले नसल्याचे तक्रारदार अारटीअाय कार्यकर्ता अमित शुक्ला यांनी म्हटले अाहे.

 

मालमत्ताधारकाकडून सुभाष मराठेंसह अायुक्त, सहायक अायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी माेठी रक्कम घेतल्याचा गंभीर अाराेप करण्यात अाला अाहे. नगररचना विभागाचे संचालक (मुंबई) यांनी मराठेंना जबाबदार धरले असून महापालिका प्रशासन त्यांच्या चाैकशीचे ढाेंग करत असल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...