आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील पाेलिसांना अाठ शाैर्यपदके, तीन राष्ट्रपती पदके; राज्‍यातील 51 पोलिसांचा सन्‍मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पाेलिस पदकांत महाराष्ट्रातील ५१ पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात अाला. यात अाठ शाैर्यपदके, ३ राष्ट्रपती पदके व ४० पाेलिस पदकांचा समावेश अाहे. देशभरातील ९४२ पाेलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. 


राष्ट्रपती पोलिस पदके : शिवाजी तुळशीराम बोडखे, सहायक पोलिस आयुक्त नागपूर, दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी पुणे, बाळू प्रभाकर पवार, सहायक उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक. 


शौर्य पदके : शीतलकुमार अनिल कुमार डोईजड- पोलिस उपनिरीक्षक, हर्षद बबन काळे- उपनिरीक्षक, प्रभाकर रंगाजी मडावी- कॉन्स्टेबल, महेश दत्तू जाकेवार- कॉन्स्टेबल, अजितकुमार भगवान पाटील- उपनिरीक्षक, टिकाराम संपतराय काटेंगे- नायब कॉन्स्टेबल, राजेंद्र श्रीराम तडमी- कॉन्स्टेबल, सोमनाथ श्रीमंत पवार- कॉन्स्टेबल. 


पाेलिस पदके : नवीनचंद्र रेड्डी- उपायुक्त मुंबई, पंजाबराव उगले- अधीक्षक एटीएस नाशिक, श्रीकांत व्यंकटेश पाठक- कमांडर, एसअारपी दौंड, धुला ज्ञानेश्वर तेले- उपअधीक्षक नांदेड, राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर- पोलिस निरीक्षक जालना, अनंत कुलकर्णी- पोलिस निरीक्षक उस्मानाबाद, रवींद्र बळीराम सपकाळे- सहायक उपनिरीक्षक जळगाव, अरुण संपत अहिरे- सहायक उपनिरीक्षक, अंबड (नाशिक), आरिफखान दाऊदखान पठाण- चालक नाशिक, सुभाष नाना जाधव- सहायक उपनिरीक्षक, नाशिक रोड, सय्यद अफसर सय्यद जहूर- हेड कॉन्स्टेबल परभणी, नानाकुमार सुरेशप्रसाद मिसार- नाशिक. 


नगरचे मुंढे, शेख 
नगर जिल्ह्यातील कर्जतचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन लक्ष्मणराव मुंढे व पीसीअार नगर येथील सहायक पाेलिस उपनिरीक्षक शेख जलील उस्मान यांना पाेलिस पदके जाहीर झाली अाहेत. मुंढे यांनी १९८६ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात सेवेला प्रारंभ केला. सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...