आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विद्यार्थिनीस ५५ कॉलेजांचे आवतण; सर्व महाविद्यालयांनी ९ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचेही केले जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील एका विद्यार्थीनीस एक-दोन नव्हे तर ५५ महाविद्यालये प्रवेश देण्यासाठी उत्सुक आहेत. विद्यार्थीनी जेकेलिया बेकरने (१७) देशभरातील ६५ महाविद्यालयांत प्रवेशासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ५५ महाविद्यालयांनी तिला प्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर या सर्व महाविद्यालयांनी जेकेलियाला सुमारे ९ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचेही जाहीर केले आहे.


जेकेलियाचे कुटुंब जॉर्जियातील अगस्ता शहरात वास्तव्याला आहे. जेकेलियाने यंदाच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यात तिला सुमारे ९७ टक्के गुण मिळाले. अगस्ता शहरातील लुसी सी लॅने या विद्यालयात ती शिकते. जेकेलियाला प्रवेश देण्याचे नेमके कारण मात्र या महाविद्यालयांनी स्पष्ट केलेले नाही. जेकेलियाने नियमांचे पालन करून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे सांगण्यात आले. सामान्यपणे लोक एवढ्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी अर्ज दाखल करत नाहीत. प्रवेश प्रक्रियेच्या कसोटीवर ती यशस्वी झाली आहे. त्यामुळेच जेकेलियाच्या नावे अनोखा विक्रम तयार झाला आहे.

 

पेन्सेल्विनिया स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, युनिव्हर्सिटी ऑफ आेक्लाहोम सारख्या मोठ्या विद्यापीठांनी तिचे स्वागत केले आहे. प्रवेशासाठी एवढ्या व्यापक यशाची अपेक्षा नव्हती. आईने ६५ महाविद्यालयांत अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला. 

 

जेकेलियाची आई डेनिस बेकर यांनी सैन्यात नोकरी केली होती.  त्या म्हणाल्या, हे सर्व मुलीचे परिश्रमाचे फळ आहे. जेकेलियाचे एक शिक्षक बिल डन्बर महणाले, जेकेलियासारखी विद्यार्थीनी वर्गात असल्यास तुम्ही खूप नशीबवान ठरता. जेकेलिया व्हॉलीबाॅल, बास्केटबाॅल, गोल्फ, टेनिस, फुटबॉल खेळते. ती मार्चिंग बँड, विद्यार्थी परिषदेची सदस्य आहे. जेकेलियाचे यश महत्त्वाचे आहे कारण अमेरिकेत महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील लाचखोरीची १५ प्रकरणे अलीकडेच उजेडात आली होती. त्यामुळे जेेकेलियासारख्या आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

 

होमवर्क केल्यास अभ्यास सोपा होईल : जेकेलिया
अभ्यासात मला पूर्वी फार गती नव्हती. त्यामुळे मी संभ्रमित व्हायचे. काय करावे कळत नसे. मग आईने परिश्रमाला योग्य दिशा दिली. तिने होमवर्क करण्याचा सल्ला दिला. मग अभ्यास सुकर झाला, असे जेकेलियान सांगितले.