आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षात पहिल्यांदा मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिली सूट, 55 हजारपेक्षा जास्त नवीन पेट्रोल पंप उघडायला मिळेल मान्यता, जाणून घ्या प्रोसेस...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- मागच्या 4 वर्षात पहिल्यांदा मोदी सरकारने स्टेट रन ऑइल मार्केटिंग कंपनीज(OMCs) ना फ्यूल स्टेशन वाढवण्याची परवानगी दिली आहे. सरकार पुढच्या 5 वर्षात पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट करण्याचा विचार करत आहे. यानंतर सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशनने 55 हजार 649 नवीन पेट्रोल पंप उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

- आईओसी 26,982, बीपीसीएएल 15802 आणि एचपीसीएल 12,865 पेट्रोल पंप उघडण्याच्या तयारीत आहे. अशातच तुम्हीदेखील पेट्रोल पंपची डीलरशिप घेऊ शकता. यावेळेस डीलरशिप घेणे अजून सोपे केले आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

 

पूर्ण प्रॉसेस आहे ऑनलाइन

- तीन्ही कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलरशिपच्या अर्जासाठी www.petrolpumpdealerchayan.in वेबसाइट बनवली आहे. या वेबसाइटवर सगळ्या नियमांची आणि अटींची माहीती दिली आहे. 
 - या वेबसाइटमध्ये राज्यांच्या रीजनल ऑफिसचे अॅड्रेस आणि नंबरदेखील दिले आहेत. दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा अॅड्रेसवर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.


अनेक नियम केले सोपे
- जे लोक सलेक्ट होतील त्यांनाच डॉक्यूमेंट जमा करावे लागतील. 
- अकांउटमध्ये 25 लाखांचे बँक बॅलेंस असावेच असे नाही.
- ज्या लोकांकडे जमीन नाहीये ते देखील अप्लाय करू शकतात. पण जेव्हा जमीन दाखवण्याची वेळ येईल तेव्हा अॅग्रीमेंट केलेली जमीन दाखवावी लागेल. 
- सगळे रिटेल आउटलेट्स लेटेस्ट टेक्नोलॉजीने तयार होतील. 
- या वेळेस 60 परसेंट आउटलेट डीलर ऑन्ड असतील. 40 परसेंटच्या फर्म्स अंतर्गत काम करतील.

बातम्या आणखी आहेत...