आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार बंद करून वृद्ध सासुला जिवंत जाळले, आवाज बाहेर येऊ नये म्हणून TV चा आवाज वाढवला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटारसी(मध्याप्रदेश)- गुरुवारी एका सुनेने आपल्या वृद्ध सासुला दार बंद करून घरात जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये निर्वस्त्र अवस्थेत सापडला. 

 

पोलिसांनी सांगितले की, कृष्णा यादव(55) यांचे सुनेसोबत रोज भांडण होत होते. गुरूवारी सकाळी 8.45 वाजता आरोपी वर्षाचा नवरा कामावर गेला. त्यानंतर त्या दोघीत भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी महिलेने सासुवर केरोसिन टाकुन तिला जिवंत जाळले. घरातुन धुर आलेला पाहुन लोकांनी पोलिसांना बोलवले पण पोलिसांनी सामान्या चौकशी करून निघुन गेले. पोलिस आल्याचे पाहून वर्षाने सासुला बाथरूममध्ये कोंडले, त्यात त्यांचा मृत्यु झाला आहे.


हत्त्येमागे 2 कारणे सांगण्यात येत आहेत
प्रेम संबंध- वर्षाचे बंटी सोनकर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे उघड झाले आहे. यामुळेच 5-6 वर्षांपासून त्या दोघीत वाद व्हायचा.


प्रॉपर्टी- मृत महिलेच्या घरासमोर एक जमीनीचा तुकडा आहे. याला विकण्यासाठी दोघींत भांडणे होत होती. यामुळेच वाद वाढल्या असल्याची शक्यता आहे.


टॉयलेटमध्ये मिळाला मृतदेह
पोलिसांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकट्या महिलेला इतका मोठा गुन्हा मुलांसमोर करणे सोपे नवह्ते, त्यामुळे तिच्यासोबत इतर कोणचातरी हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

बातम्या आणखी आहेत...