आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 55 year old British Prime Minister Boris Johnson's Will Marry With Girlfriend Carrie Symonds Soon

५५ वर्षीय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे प्रेयसी कॅरी सायमंड्सशी लग्न ठरले, लवकरच पिता होणार

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये २५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानपदावर असताना करणार लग्न
  • बोरिसचा तिसरा विवाह, दुसऱ्या पत्नीची ४ मुले

लंडन - ब्रिटनचे ५५ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ३१ वर्षीय प्रेयसी कॅरी सायमंड्सशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील काही महिन्यातच बोरिस जॉन्सन पिता होणार आहेत. हा मुलगा कॅरी सायमंड्सपासून असेल. ब्रिटिश माध्यमांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन कॅरीसोबत सरकारी निवासस्थानी राहतात. अनेक वर्षांपासून  ते एकत्र राहात आहेत. मूल होण्याअाधीच जॉन्सन व कॅरी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिसते. ब्रिटनच्या २५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादा राजकीय नेता पंतप्रधानपदावर असताना लग्ञन करतो आहे. स्थानिक माध्यमांनी म्हटले, त्यांना ही बातमी दडवून ठेवायची होती. परंतु कॅरीची गर्भावस्था लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. ‘द सन’ ने लिहिले, कॅरी आताही त्यांच्या कामकाजात व्यस्त आहेत. त्या काही पर्यावरणाच्या योजनेवर काम करत आहेत. जॉन्सनची दुसरी पत्नी मारिना व्हीलर यांच्याशी घटस्फोट झालेला आहे. व्हीलरपासून त्यांना चार मुले आहेत.  कॅरी जॉन्सन यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. बोरिस यांचे पहिले लग्न १९८७ मध्ये मॉस्टिन ओवेेनशी झाले. ते १९९३ मध्ये संपुष्टात आले. यानंतर १९९३ मध्ये त्यांनी व्हीलर या मूळच्या भारतवंशीयांशी दुसरे लग्न केले होते. कॅरीने इन्स्टाग्रामवर लिहिले : आम्हाला खूप आनंद झालाय


कॅरी सायमंड्सने इन्स्टाग्रामवर लिहिले, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याची कल्पना आहे. माझ्या काही मित्रांना याची कल्पना नसेल. त्यांना सांगण्यास आनंद होतो की, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीच उन्हाळ्याच्या सुरुवातीला आम्हाला मूल होणार आहे. याचाही खूप आनंद झालायबातम्या आणखी आहेत...