Home | National | Delhi | 55 year old man physically abuse 3rd class girl student

महिला टीचर ट्यूशनच्या बहाण्याने 10 वर्षांच्या मुलीला घेऊन जायची आपल्या घरी, तिथे तिचा 55 वर्षीय मित्र मुलीवर करायचा अत्याचार, असा झाला खुलासा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 07:43 PM IST

भीतीपोटी मुलीने कोणालाच काही सांगितले नाही.

 • 55 year old man physically abuse 3rd class girl student

  नवी दिल्ली- वसंत कुंज नॉर्थ एरियामध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका शाळेतील महिला टीचर मुलीला आपल्या घरी घेऊन जात होती आणि तिथे तिचा 55 वर्षीय मित्र मुलीवर बलात्कार करायचा. हे अनेक दिवसांपासून सुरू होते, मुलीने टीचरला सगळा प्रकार सांगितला पण ती या कारस्थानात सहभागी असल्यामुळे मदत केली नाही. काही दिवसानंर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अॅक्शन घेतली. मुलीच्या वैद्यकिय चाचणीनंतर तिची साक्ष घेण्यात आली आणि त्याआधारे दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आले. मायकल(55) आणि एमा(45) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी नावे आहेत.


  मुलगी टीचरला दीदी म्हणायची
  पीडित मुलगी एका सरकारी शाळेत तिसरीत शिकत होती. तिच्या आईचा मृत्यू झाला आहे, तर वडिलांनी दुसरे लग्न करून वेगळं राहतात. मुलगी आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहते. मुलीचे नातेवाईक ग्रेटर कैलाश परिसरातील एका महिलेच्या घरात राहात होते. ते महिलेला आजी म्हणून हाक मारायचे, तर आरोपी मायकल त्याच महिलेचा मुलगा होता. ती मुलगी कधी-कधी आपल्या नातेवाईकासोबतच त्या आजीच्या घरी जायची. तेथे मुलीला एकट्यात नेऊन मायकल तिच्यासोबत छेडछाड करायचा. महिला आरोपी एमाचा मायकलच्या घरी येण-जाणे असायचे, आणि मुलगी एमाला दिदी म्हणायची.


  टीचरकडे केली तक्रार, पण काही उपयोग झाला नाही
  मागील महिन्यात एमाने मुलीच्या घरच्यांना विश्वासात घेऊन मुलीला ट्यूशन देण्याची मागणी केली. मुलीच्या घरच्यांना होकार दिला. त्यानंतर एमाने तिला आपल्या गाडीत बसवून आपल्या घरी नेले. तेथे मायकल आधीच येऊन पोहचला होता, तेव्हा त्याने मुलीवर लैंगिक अत्याचाच केला. या घटनेची मुलीने एमाला माहिती दिली, पण तिने लक्ष दिले नाही. त्यानंतर दर शनिवार-रविवार एमा मुलीला आपल्या घरी नेत असे आणि रात्री परत आणुन सोडत होती. त्यानंतर अनेकवेळा आरोपी मायकलने मुलीवर बलात्कार केला. भीतीपोटी मुलीने कोणालाच काही सांगितले नाही. एके दिवस पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मुलीसोबत वाईट कृत्य केले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे घर गाठले आणि घडलेला सगळा प्रकार सांगिला. त्यानंतर मुलीने आपल्यासोबत होत असलेल्या सगळ्या वाईट कृत्याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीच्या साक्षीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केले.

Trending