आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत स्फोटके निकामी करण्याच्या कामात ५५० महिलांचा सहभाग ; उत्पन्नाचे साधन ठरले काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो -  श्रीलंकेत सुमारे ५५० महिला भूसुरुंगांना जमिनीतून बाहेर काढून टाकण्याच्या मोहिमेत व्यग्र आहेत. दहा वर्षांपूर्वी यापैकी अनेकींची घरेदारे याच स्फोटकांमुळे उद्ध्वस्त झाली होती. स्फोटकांमुळे खराब झालेल्या जमिनीला पुन्हा कसण्यासाठी महिलांनी हे काम हाती घेतले. १९८३-२००९ दरम्यान नक्षलवादी संघटना लिट्टे व श्रीलंकेमध्ये गृहयुद्ध झाले होते. त्यात सुमारे ८० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. तेव्हा स्वतंत्र तामिळी राज्यासाठी संघर्ष सुरू होता. भूसुरुंग स्फोटकांना शोधून निकामी करणे व बाहेर काढण्याच्या मोहिमेत ५० टक्के महिला आहेत. अनेकींनी गृहयुद्धादरम्यान पतीला गमावले आहे. त्या दु:खावर मात करून त्यांनी रोजगार शोधला आहे. अमेरिकेच्या हालो ट्रस्टने महिलांना स्फोटकांची साफसफाई करण्याचे काम रोजगार म्हणूनही दिले आहे.
 

 

 

महिलांच्या उत्पन्नाचे साधन ठरले काम

श्रीलंकेत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्फोटकांचा नायनाट करण्याच्या कामात गेल्या १० वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी सुमारे ३.१० लाख भूसुरुंगांची साफसफाई केली. त्याशिवाय ६.६ लाख काडतुसे व ६५ हजार इतर स्फोटकेही नष्ट केली. ही स्फोटके जाफना बेट, किलिनोच्ची, मुलईटिवू जिल्ह्यात आढळून आली होती. सुरुवातीला स्फोटके नष्ट करताना महिलांना भीती वाटली होती. मात्र आज हे काम त्यांच्यासाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...