आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 56 Polar Bears Entered The Village Due To Melting Snow, 7000 People Imprisoned In Homes

गावात घुसले 56 ध्रुवीय अस्वले; 7000 नागरिक घरात कैद, लहान मुलांच्या शाळेला सुट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशीयातील बर्फाछाद्दीत चूकोटका गावात अस्वलांचा अड्डा, शिकार करणे गुन्हा
  • 600 किलो वजनी आणि 40 किमी प्रती तासांच्या वेगाने पळणाऱ्या अस्वलांपासून दूर राहण्याचा नागरिकांना सल्ला

मॉस्को- रशीयात वातावरणात होणारा बदल जाणवू लागला आहे. रशीयातील बर्फाछाद्दीत असलेल्या चूकोटका गावात 56 ध्रुवीय अस्वल घुसले आहेत. यामुळे गावातील अंदाजे 7 हजार नागरिक आपल्या घरात कैद झाले आहेत. उपाशी आणि शिकारी अस्वलांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर न येण्याचा निर्णय घेतला आहे. गावात अस्वले घुसण्याची ही दुसरी वेळ आहे. रशीयातील मीडियामध्येही या अस्वलांच्या मुद्द्याने जोर धरला आहे. प्रशासनाने 600 किलो वजनी आणि 40 किमी प्रती तासांच्या वेगाने धावणाऱ्या या शिकारी अस्वलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रशियात या ध्रुवीय अस्वसांना गोळी मारणे गुन्हा आहे. वन्यजीव शास्त्रज्ञ टॉड एटवुडने सांगितले की, उन्हाळ्यात बर्फ वितळू लागल्याने ध्रुवीय अस्वल शहरी परिसराकडे येतात.

आर्कटिकचे तापमान 0.75° सेल्सियसने वाढले
 
ग्लोबल वार्मिंगबद्दल जर्नल सायंस अॅडवांसमध्ये प्रकाशित एका शोधामध्ये ग्लोबल वार्मिंगच्या प्रभावांचे आकलन केले. शोधामध्ये दावा करण्यात आला आहे की, 100 वर्षात जितके पृथ्वीचे एकूण तापमान वाढले, तितके एकट्या आर्कटिकमध्येच मागील 10 वर्षात वाढले आहे. मागील एका दशकात आर्कटिकचे तापमान 0.75° डिग्री सेल्सियसने वाढले आहे. हा आकडा मागील 137 वर्षात झालेल्या बदलांइतका आहे.

बातम्या आणखी आहेत...