आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमत्कारिकरीत्या प्रेग्नेंट झाली 56 वर्षांची महिला, आधीपासूनच आहे एवढ्या मुलांची...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू येथील त्रिची गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे डिलेव्हरी डेटपूर्वी एक गर्भवती महिला आपल्या कुटुंबियांसोबत हॉस्पिटलमधून फरार झाली. चकित करणारी गोष्ट म्हणजे या महिलेला आधीपासूनच 9 अपत्य आहेत. 10 व्या वेळेस ती केव्हा प्रेग्नेंट झाली हेसुद्धा तीला माहिती नव्हते.


वयाच्या 56 व्या वर्षी 10 व्या वेळेस झाली प्रेग्नेंट
मिळालेल्या माहितीनुसार, गरोदर महिलेचे नाव आरायी असून पतीचे नाव आनंदन आहे. महिले वय 56 वर्ष असून तीला 9 अपत्य आहेत. 9 व्या अपत्याला जन्म दिल्यानंतर 13 महिन्यांनी तब्येत खराब झाल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती.


डॉक्टरांनी डिलिव्हरीनंतर बर्थ कंट्रोल करण्याचा दिला होता सल्ला, परंतु...
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी आणि डिलिव्हरीनंतर बर्थ कंट्रोल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर उपचार सुरु केला गेले. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्त देण्यात आले. परंतु काही काळाने समजले की, गरोदर महिला कुटुंबियांसोबत हास्पिटलमधून पळून गेली.


गरोदर केव्हा झाली याची माहिती नाही
त्या महिलेने डॉक्तरांना सांगितले होते की, ती केव्हा गरोदर झाली याविषयी तीला काहीच माहिती नाही. मोनोपॉझ नंतर गर्भवती राहणार नाही असे तीला वाटले होते. अरायी कुटुंबासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. तिच्या चार मुलांचे लग्न झाले आहे.


नऊ अपत्यांना घरीच दिला जन्म
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आपल्या नऊ मुलांना घरीच जन्म दिला आहे. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये सर्जरी करतील या भीतीने ती दवाखान्यात जात नव्हती. याच कारणामुळे ती हॉस्पिटलमधून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...