आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफतेहपूर(राजस्थान)- येथील जेठवा बास बस स्टँडवरून पायी चालत घरी जात असलेल्या 56 वर्षीय महिलेचा दोन तरुणांनी अपहरण केले. नंतर फतेहपूर बीडमध्ये नेऊन 3 तास तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी त्या आरोपींनी या अश्लील घटनेचा व्हिडिओदेखील बनवला. बलात्कारानंतर महिलेला तिच्या घराजवळ सोडून ते पसार झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
फतेहपूरचे डीएसपी कुशाल सिंह खीची यांनी सांगितले की, अटक झालेल्या आरोपींमध्ये लक्ष्मणगडचा रहिवासी मनोज जाखड (27) आणि कल्याणपूरातन दांतरू-फतेहपूरचा रहिवासी वीरेन्द्र डोटासरा(25) आहेत. त्या दोघांचे मोबाईल जप्त करून फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवले आहेत.
पायी चालत गावी येत होती महिला
पीडित महिला एका लग्नावरून गुरुवारी जेठवाच्या बस स्टँडवरून आपल्या दिढ किलोमीटर अंतरावरील गावाकडे पायी चालत निघाली. यावेळी दोन तरुण कारमधून आले आणि महिलेला बळजबरीने कारमध्ये बसवले. महिलेने विरोध केल्यावर तिला मारहाण केली. नंतर कार फतेहपुर बीडच्या आत असलेल्या घनदाट जंगलात नेले. तिथे गेल्यावर महिलेने विरोध केला असता, तिचे पाय बांधले आणि बलात्कार केला, शिवाय या घटनेचा व्हिडिओदेखी बनवला. सगल तीन तास बलात्कार केल्यानंतर त्यांनी महिलेला त्याच बस स्टँडवर सोडून पसार झाले. महिलेने घरी गेल्यावर आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.