आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा, ५६९ गावे तहानलेली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद जिल्ह्यात ढग दाटून येतात आणि जातात - Divya Marathi
उस्मानाबाद जिल्ह्यात ढग दाटून येतात आणि जातात

उस्मानाबाद जिल्ह्यावर या वर्षीही वरुणराजाची अवकृपा दिसत आहे. अपुरा पाऊस असल्याने तलाव, नद्या, विहिरींमध्ये पाणी आलेले नाही. जिल्ह्यात ८ दिवसांपासून एकही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ ढग दाटून येतात आणि जातात. त्यामुळे या नभाने, या भुईला दान द्यावे, असे आर्जव केले जात आहे. 
 

 

५६९ गावे तहानलेली
जिल्ह्यात ५६९ गावांमध्ये अजूनही भीषण पाणीटंचाई आहे. पाऊस नसल्याने पाण्याचे स्राेत सुरू झालेले नाहीत. यापैकी २३६ गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू असून, १०७८ अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. 

 

१२.४४ टक्के पाऊस :

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षी ६ जुलैपर्यंत १९१ मिलिमीटर पाऊस झाला होता. या वर्षी आतापर्यंत ९५ मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण १२.४४ टक्के इतके आहे.

बातम्या आणखी आहेत...