आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादकडे नेण्यात येणारे 58 उंट पकडले; दोन जण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर - हैदराबादकडे नेण्यात येत असलेले ५८ उंट साेमवारी संध्याकाळी पातूर जवळ पकडण्यात अाले. हे उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगली हाेती. याप्रकरणी गाैरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीत त्यांना उंटासोबत असलेल्या व्यक्तींनी उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितल्याचे नमूद केले. 
याप्रकरणी पोलिसांनी दाेघांची चाैकशी केली. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी वक्ताराम तानाजी वय ४० रा. रेवाडे, राजस्थान, भंवरलाल बिजर वय ५० रा. चित्तोडगड, राजस्थान या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अपघात क्रं. ३८६/ १८ कलम ११/ १ ए.एच.जे. प्राण्यांना निर्दयीपणे कोंबून नेण्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


वनराई गाैरक्षण संस्थेचे सचिव विजय समाधान बाेरकर यांनी पातूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार ते चिंचखेडवरुन पातूरकडे येत हाेते. त्यांना ५ ते ६ व्यक्ती अंदाजे उंट नेत असल्याचे दिसून अाले. त्यांनी या व्यक्तींपैकी दाेघे असलेले भवरलाल व वक्ताराम या दाेघांकडे विचारणा केली. त्यांनी उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे ते पातूर येथे निघाले, असे श्री. बाेरकर यांनी तक्रारीत नमूद केले. 


तस्करीचा पर्दाफाश करण्याचे पोलिसांसमोर अाव्हान 
१) प्राण्यांच्या मांसाची तस्करी करणारी टाेळीच सक्रिय असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. अातापर्यंत गाेवंशाची कत्तल, त्यांची अवैध वाहतुकीचे अनेक प्रकार घडले. मात्र अाता उंटाच्या कत्तलीच्या संशयावरून वाहतूक सुरु असल्याचा प्रकार उजेडात अाला अाहे. या तस्करीचे तेलंगणा, अांध्रप्रदेशात तार पसरल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. ही वाहतूक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हाेते. या सर्व राज्यातील पोलिसांना ही तस्कारांची टोळी चकमा देते कि टाेळीकडे कानाडाेळे करण्यात येताे, याचा शाेध घेण्याची मागणी अाता यानिमित्ताने हाेत अाहे. 
२) पातूर येथे पकडण्यात अालेले उंट हे राजस्थानमधील काैटाेल येथून अाणण्यात अाले हाेते. या उंटांना हैदराबादपर्यंत पाेहाेचवण्यात येणार हाेते. अाता पाेलिसांनी याप्रकरणी काहींची चाैकशी सुरु केली असून, चौकशीअंती नेमका प्रकार समाेर येणार अाहे. 


पातूर येथून हैदराबादकडे नेण्यात येणाऱ्या उंटांचा काफीला. 
पशुसंरक्षण समितीने घेतला पुढाकार 

उंटांना जीवनदान मिळण्यात स्थानिकांसह हैदराबाद येथील पशुसंरक्षण समितीचे सुरेंद्र भंडारी, िहतेश जैन, महिप जैनसह अनेकांचा सहभाग अाहे. उंट पातूरमार्गे येत असल्याची माहिती पशुसंरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अाधीच मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी ही माहिती पातूर-बाळापूर तालुक्यातील अापल्या परिचितांना दिली. अखेर साेमवारी हे उंट पातूरजवळ जिवंत पकडण्यात यश अाले.

बातम्या आणखी आहेत...