‘59 मिनिट’ मध्ये / ‘59 मिनिट’ मध्ये कर्ज देणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) कंपन्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटात मंजूर करण्यात येते.

वृत्तसंस्था

Mar 02,2019 12:04:00 PM IST

नवी दिल्ली - लघु आणि मध्यम कंपन्यांना कर्ज देण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्वात मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. पोर्टलचे नाव PSBloansin59minutes.com असे आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे लाँच करण्यात आले होते. या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) कंपन्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटात मंजूर करण्यात येते. त्या नंतर त्या कंपन्यांना सात ते आठ दिवसात कर्जाचा पैसा मिळतो.


स्विस फायनान्शियल संस्था क्रेडिट सुइसनुसार या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत ३०,००० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामधील २५,००० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवरून ९०,००० एसएमईच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. यातील २४,००० नवीन ग्राहक आहेत. तर उर्वरित जुने ग्राहक आहेत, ज्यांना बँका या प्लॅटफॉर्मवर घेऊन आल्या आहेत. नवीन ग्राहकांना ६,४०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. नवीन कर्जाची सरासरी २७ लाख रुपये आहे.


जीएसटी नोंदणी अनिवार्य
- एसएमई जीएसटी नोंदणीच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकतात.
- कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतून कर्ज घ्यायचे आहे, त्याची निवड करता येते.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित शाखेला याची सूचना पाठवली जाते.
- शाखेत आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतर कर्जाची रक्कम मिळते.

X
COMMENT