आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड करा 10 GB चा व्हिडिओ; लवकरच भारतात येणार ही सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  नेटवर्कच्या बाबतीत आपली पिढी आता जवळपास दहा पटीने वेगवान होणार यात शंकाच नाही. त्यासाठी टेलीकॅाम कंपन्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून सर्व इंटरनेट युझर्स आता 5G नेटवर्कच्या प्रतिक्षेत आहे. 5G म्हणजे फिफ्थ जनरेशन मोबाइल नेटवर्क यालाच एलटीईदेखील म्हणतात. 5G नेटवर्क आल्यानंतर युझर्सला व्हिडिओ किंवा चित्रपट डाउनलोड करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करायची गरज पडणार नाही. या नेटवर्कमध्ये डाउनलोडिंग स्पीड 10 गीगाबाइट प्रति सेकंद असल्याने युझर्स शंभर पटींनी जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करु शकतो किंवा इंटरनेट वापरु शकतो. 

 

5G नेटवर्कचे फायदे

देशात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी अनेक स्टीअरींग कमिटी स्थापन करण्यात आल्या आहे. सरकारनेही सप्टेंबर 2017मध्ये एक कमिटी स्थापन केली होती. त्यानुसार ऑक्टोबर 2019 पर्यंत यासंबंधी निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. 5G नेटवर्कमुळे देशात डाउनलोड आणि डेटा ट्रान्सफरचा वेग हा अनेक पटींनी वाढणार आहे. या नेटवर्कमुळे मोठ्या शहरात अनेक बदल होणार आहे. देशातील मेट्रो ट्रेनसह अनेक ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानासाठीही याचा फायदा होणार आहे.   

 

पुढील स्लाइडवर पाहा- कोणकोणत्या क्षेत्रात 5G नेटवर्क सुविधा सुरू करणार...

बातम्या आणखी आहेत...