आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची वेळ बदलली, 24 फेब्रुवारीला परीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांच्या वेळांत बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी येथे दिली. बदललेल्या वेळानुसार ही परीक्षा २४ फेब्रुवारीला दुपारी  १ ते ५ या वेळात होईल भारतीय सैनिकी शाळाप्रवेश पुनर्परीक्षा याच दिवशी होणार असल्याने हा बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले.   


शिष्यवृत्ती परीक्षा आधी १७ फेब्रुवारीला होणार होती. मात्र, याच दिवशी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असल्याने लोकसेवा आयोगाने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलण्याची विनंती केली होती. त्यानुसार, परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४ फेब्रुवारी हा दिवस जाहीर केला. त्याच दिवशी सकाळच्या सत्रात सैनिकी शाळा परीक्षा असल्याने शिष्यवृत्तीची फक्त वेळ बदलली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा दुपारी १ ते २.३० (पहिला पेपर) आणि ३.३० ते ५ (दुसरा पेपर) अशी होईल, असे आयुक्तांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...