Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | 6.40 lakh stolen cameras were found

चोरीला गेलेले 6.40 लाखांचे कॅमेरे सापडले; विकण्याची माहिती नसल्याने सापडले चोर 

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 08:57 AM IST

अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना थांबवून आपल्याकडचे कॅमेरे विकत घेण्याचा आग्रह करीत असल्याचे आढळले होते. 

  • 6.40 lakh stolen cameras were found

    लातूर- चोरी करणे सोपे आहे पण ती पचवणे अवघड आहे असे म्हणतात. याची प्रचिती लातूरमध्ये आली. साधारण महिनाभरापूर्वी एका लग्न समारंभाचे छायाचित्रणाचे कंत्राट घेणाऱ्या फोटोग्राफरच्या गाडीची काच फोडून साडे सहा लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स असे साहित्य चोरट्यांनी पळवले होते. परंतु हे साहित्य कोणाला विकायचे असा प्रश्न त्यांना पडला. अखेर रस्त्यावर थांबून जाणाऱ्या येणाऱ्यांना कॅमेरे विकत घेणार का असा प्रश्न विचारत असताना काहींना संशय आला आणि चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

    लातूरच्या औसा रस्त्यावरील मंगल कार्यालयात गेल्या महिन्यात एक लग्न होते. या लग्नाच्या छायाचित्रणाचे काम झाल्यानंतर छायाचित्रकाराने कॅमेरे, लेन्स असे महागडे साहित्य मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या आपल्या कारमध्ये ठेवून कार लॉक केली. जेवण झाल्यानंतर तो ६ ला उशिरा कारजवळ गेला असता कारच्या काचा फुटलेल्या आढळून आल्या. आतील कॅमेऱ्याच्या बॅगही गायब होत्या. त्या कॅमेरा, लेन्सची किंमत तब्बल ६ लाख ४० हजार इतकी होती. त्याने रीतसर विवेकानंद चौक पोलिसांत तक्रार नोंदवली. नेहमीप्रमाणे पोलिसांचा तपासही सुरू राहिला. हे प्रकरण बंद झाले असे वाटत असतानाच एक अल्पवयीन मुलगा औसा रस्त्यावरील बिडवे मंगल कार्यालय परिसरातच कॅमेरा विकत असल्याचे पोलिसांना एकाने कळवले. त्याची खातरजमा करण्यासाठी गुरुवारी पोलिसांनी सायंकाळी सापळा लावला. तेथे एक अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना थांबवून आपल्याकडचे कॅमेरे विकत घेण्याचा आग्रह करीत असल्याचे आढळले.

    पोलिसच बनला बनावट ग्राहक :
    एक अल्पवयीन मुलगा कॅमेरे विकत असल्याची माहिती एका नागरिकाने संशयातून पोलिसांना दिल्यानंतर एक पोलिसच ग्राहक बनून त्याच्याकडे गेला. पोलिसाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तर देऊन पळ काढण्याच्या तयारीत होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता महिनाभरापूर्वी गाडीच्या काचा फोडून बॅग पळवल्याचे त्याने कबूल केले. त्याच्या साथीदारालाही पकडण्यात आले.

Trending