आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिराच्या बाहेर मिळाले नवजात बाळ, 1.8 डिग्री टेम्प्रेचरमध्ये गुंडाळलेले होते कपड्यात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंझुनूं- ही भयानक घटना त्याच झुंझनूं जिल्ह्यातील आहे जो जिल्हा काही दिवसांपूर्वीच एक नवजात बाळाला वाचवण्यात प्रसिद्ध झाला होता. सोमवारी रात्री 2 वाजता घोड़ीवारा बालाजी मंदिरच्या बाहेर 6 तासांपूर्वी जन्मलेली नवजात मुलगी कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मंदीराचे वॉचमन जगदीश सिंह यांना मिळाली. ही जागा फतेहपुर पासून 35 किमी आहे जिथे या वर्षी सर्दीचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड तुटला आहे. सोमवारी हे तापमान 1.8 डिग्री होते. प्रशासनाचा इतका निष्काळजीपना की, घटनास्थळी न पोलिस आले ना अँब्यूलन्स आली. शेवटी लोकांच्या मदतीने मुलीला रूग्णालयात पाठवण्यात आले.

 

सीसीटीवी कॅमरापासून लपून ठेवले बाळाला.
मंदीरात मुख्य गेटपासून ते आत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण चलाखीने कॅमेरापासून लपून बाळाला ठेवण्यात आले. बाळाला कोणी ठेवले ते कळु शकले नाही.


ज्या अवस्थेत बाळाला रूग्णालयात नेले होते, त्या अवस्थेत तिचा जीव वाचणे अवघड होते पण डॉक्टरांच्या परिश्रमांनी त्या मुलीला नवीन जीवण मिळाले. तिचे पूर्ण शरीर ठंड पडले होते, पोटात आणि तोंडात मळ गेला होता. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले आहे.

 

6 तासांपूर्वी जन्म झालेल्या मुलीने सहन केले हे सगळं 
मुलीचा जन्म 6 तासांपूर्वी झाला होता आणि तिचा जन्म पूर्ण 9 महिन्यांनंतर झाला होता. तिला रूग्णालयात आणले तेव्हा तिला श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे तिला ऑक्सीजन देण्यात आले. शरीर नीळे पडले होते आणि तोंडात आणि पोटात पाणी भरले होते. ती खुप कुडकु़डत होती आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यामुळे तिला आयसीयुत भर्ती केले गाले. उपचारानंतर तिली झटके येत होते पण सध्या ती ठीक असून तिला पुढील उपचारासाठी न्यू बोर्न केअर यूनिटमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

रात्री आला रडायचा आवाज 
मी आणि माझा भाच्चा विक्रमसिंह मंदिराची राखण करत होतो, तेव्हा मला रडायचा आवाज आला. सुरुवातीला मला वाटले मांजर असेल पण थोड्यावेळानंतर परत आवाज आला तेव्हा मी जाउन पाहिले. तेव्हा मला कपड्यात गुंडाळलेली मुलगी मिळाली. मी लगेच लोकांच्या मदतीने तिला रूग्णालयात दाखल केले
- जगदीश सिंह, वॉचमन बालाजी मंदिर

बातम्या आणखी आहेत...