आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 IPS-IAS ज्यांनी केली आत्महत्या : कोणी स्वतःवर गोळी झाडून तर कोणी आयुष्याला कंटाळून रेल्वेखाली मारली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएस सुरेंद्र दास यांच्यावर सोमवारी लखनऊ येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा भाऊ नरेंद्र दास यांनी मुखाग्नी दिला. राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील बुधवारपासून 4 दिवस मृत्यूशी लढताना त्यांचा मृत्यू झाला. सुसाइड नोटमध्ये मृत्यूचे कारण घरगुती वाद असल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र यांच्याप्रमाणेच आणखीही काही आयएएस-आयपीएस ऑफिसर्सनी कौटुंबिक वाद किंवा आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 दिवंगत ऑफिसर्सची माहिती देत आहोत.


लाल पेनाने लिहिली होती सुसाइड नोट 
2014 बॅचच्या आयपीएस सुरेंद्र दासने गेल्या बुधवारी सकाळी 4 वाजता विष घेतले होते. तब्येत बिघडल्यामुळे आणि रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांना तात्काळ रिजेन्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विषामुळे सुरेंद्र दास यांचे ब्रेन, किडनी, लिव्हर, डॅमेज झाले होते आणि डाव्या पायात रक्त जमा झाले होते. डॉक्टरांच्या पॅनलने त्यांच्या पायाचे ऑपरेशन करुन जमा झालेले रक्त काढले होते. यानंतरही त्यांच्या शरीरात योग्य प्रकारे रक्तप्रवाह होत नव्हता. रविवारी त्यांची तब्येत बिघडली आणि यानंतर त्याचे निधन झाले. सुरेंद्र यांचे कुटुंबीय पत्नी रवीनाला त्यांच्या मृत्यूचे कारण सांगत आहेत.


कँसरशी हरला 'दबंग'
11 मे 2018 ला महाराष्ट्राचे माजी एटीएस चीफ हिमांशू राय यांनी सर्व्हिस सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाइड नोटमध्ये कँसरला आत्महत्येचे कारण सांगितले होते. 55 वर्षीय हिमांशु यांना कँसर होता आणि ते स्टिरॉइड्सवर जिवंत होते. आजार वाढतच चालला होता आणि ते डिप्रेशनमध्ये  राहू लागले होते.


आजारपणाला कंटाळून दिला जीव 
29 डिसेंबर, 2016 मध्ये उत्तर प्रदेश कॅडरचे वरिष्ठ आयएएस ऑफिसर संजीव दुबे यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. 1987 बॅचचे दुबे हे होमगार्ड विभागात प्रिन्सिपल सेक्रेटरी पदावर नियुक्त होते. त्यांनी सुसाइड नोटमध्ये आजरपणामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.
 

 

प्रशासकीय दबावामुळे केली आत्महत्या 
30 नोव्हेंबर, 2009 ला सिनिअर आयएएस ऑफिसर हरमिंदर राज सिंह यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 1978 बॅचचे हरमिंदर उत्तर प्रदेशचे प्रिन्सिपल सेक्रेटरी (हाउसिंग) होते. रिपोर्टनुसार हरमिंदर हे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्या वादग्रस्त 'ड्रीम प्रोजेक्ट'शी संबंधित होते. रिपोर्टनुसार हरमिंदर यांनी प्रशासकीय दबावामुळे आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...