आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2019 : गुंतवणूक-बचतीसाठी तुम्ही हे करू शकता : बचतीसाठी ६ पर्याय, जेथे पैसे गुुंतवू शकता...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी २.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कर-शुल्क, गुंतवणूक व बचतीबद्दल अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. या पानावर वाचा - कर व बचतीबद्दलचे महत्त्वाचे बदल व त्यांचे परिणाम.  कर वाचवण्यासाठी सेव्हिंग प्लॅन कसा आखायचा हे एक्स्पर्ट््सकडून जाणून घ्या

 

रिअल इस्टेटमध्ये ५ मोठ्या घाेषणा, ४५ लाखांपर्यंतच्या घर खरेदीवर १५ वर्षांत व्याजात ७ लाखांपर्यंतची सवलत

घोषणा: ४५ लाख रुपयांपर्यंतचे घर कर्ज घेऊन खरेदी केल्यास आता १.५० लाख रुपयांऐवजी ३.५० लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर आयकरात सवलत मिळेल. ही सुविधा ३१ मार्च २०२० च्या आधीच्या खरेदीदारांनाच मिळेल. अनियमिततांमुळे आता हाउसिंग फायनान्स कंपन्यांचे रेग्युलेशन नॅशनल हाउसिंग बँकेकडून (एनएचबी) घेऊन आरबीअायला देण्यात आले आहे. एखादी व्यक्ती घर विकून येणारा पैसा स्टार्टअपमध्ये लावत असेल तर त्याला ३१ मार्च २०२१ पर्यंत कॅपिटल गेन टॅक्सवर सूट मिळेल. एफडीआय व एफआयआय आता डेबिट सिक्युरिटीत भाग घेऊ शकतील. विदेशी पोर्टफोलिअो गुंतवणूकदारांना (एफपीआय) रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे लिस्टेड डेट पेपर खरेदी करण्याची परवानगी मिळू शकते. यामुळे हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी पैसा मिळवण्याची नवीन साधने खुली होतील.
 

परिणाम:

गृहकर्जाच्या व्याजावर कर सवलत वाढल्याने १५ वर्षांच्या कर्ज कालावधीत ७ लाखांपर्यंतची बचत होईल. नव्या व जुन्या घरांना मागणी वाढेल. सोबतच बनवणाऱ्या व घरासाठी कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांची स्थिती सुधारेल. रोजगाराच्या संधी मिळतील. रिअल इस्टेट मंदीतून सावरू शकते. स्वस्त घरांची मागणी वाढेल. घरांची विक्री, मागणीत तेजी येईल.  

 

सोन्याची खरेदी घटणार, तर गोल्ड बाँडची मागणी वाढेल

घोषणा: बजेटमध्ये सोने-चांदी आणि अन्य किमती धातूंच्या आयातीवर कस्टम ड्यूटी १० ने वाढून १२.५% केली आहे. म्हणजेच २.५% ने वाढ.


परिणाम: सोने-चांदी महाग होईल. मागणी कमी होईल. या क्षेत्राशी संबंधित कंपन्या, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होईल. पेपर गोल्ड व सॉव्हरिन गोल्डकडे गुंतवणूकदार आकर्षित होतील. 

 

शेअर बाजार : उसळी कायम

सरकारी बँकांना ७० हजार कोटी रुपये दिले जातील

घोषणा: बँकांची स्थिती सुधारण्यासाठी ७० हजार कोटी रुपये दिले जातील. लिस्टेड कंपन्यांमध्ये मिनिमम पब्लिक होल्डिंग २५% नी वाढवून ३५% करण्याची विनंती सेबीला केली आहे. या वर्षी पीएसयूमध्ये १.०५ लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्टही ठेवले आहे.


परिणाम:

बँकांची स्थिती सुधारल्याने शेअर्समध्ये जास्त रिटर्नची शक्यता. 

 

एफडी/बाँड : निश्चित परिणाम

घोषणा:

इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर्सच्या माध्यमातून कार्पोरेट बाँडच्या चांगल्या खरेदी-विक्रीसाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म युजर फ्रेंडली बनवला जाईल.


परिणाम:

कॉर्पोरेट बाँड खरेदी-विक्री करणे सोपे होईल. एफडीच्या व्याज दरावर कोणताच परिणाम होणार नाही. 

 

विमा : विश्वास कायम

विमा कंपन्यांत १००% एफडीआय गुंतवणूक होईल

घोषणा: विमा कंपन्यांमध्ये १००% एफडीआय गुंतवणूक होऊ शकेल. मीडिया आणि एव्हिएशन क्षेत्रातही असे करण्याचा विचार आहे. विदेशी विमा कंपन्या आता देशी कंपन्यांसोबत ५००० कोटींऐवजी १००० कोटींचा स्टेक असल्यासच व्यवसाय करू शकतील. 


परिणाम: विमा स्वस्त होईल. सुविधा वाढू शकतात. गुंतवणूकदारांनाही या कंपन्यांमध्ये फायदा होऊ शकतो. 

 

म्युच्युअल फंड : सर्वात दीर्घ रिटर्न

नवी घाेषणा नाही, तरीही एसआयपीत चांगले रिटर्न

घोषणा: म्युच्युअल फंडांबाबत सरकारने कोणतीच उल्लेखनीय घोषणा केली नाही. तथापि, याच्याशी संबंधित कंपन्या सरकारकडे लाँग कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूचना देण्याची मागणी करत होत्या. 


परिणाम: कोणतीच घोषणा झालेली नसतानाही म्युच्युअल फंडात आधीप्रमाणे चांगले रिटर्न मिळतील.

 

गुंतवणूक कुठे करावी : प्राॅपर्टी व शेअर बाजारात गुंतवणुकीमुळे लाभ

> 1.  गेल्या वर्षापर्यंत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे मानले जात नव्हते. परंतु, नवीन घोषणांनंतर यातील गुंतवणूक दुहेरी फायदा देईल. 

> 2. शेअर बाजारात गुंतवणुकीपेक्षा जास्त रिटर्न मिळत राहील. म्युच्युअल फंडासाठी खास घोषणा झालेली नसतानाही एसआयपीमध्ये रिटर्न मिळेल.

> 3. सोने-चांदी व एफडीमध्ये गुंतवणूक तुलनात्मकदृष्ट्या कमी रिटर्न देणारी राहील. छोट्या बचतीत कमी व्याज मिळणे याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

 

गुंतवणुकीतून वर्षभरात काय मिळेल : प्रॉपर्टीत १०-११% रिटर्न मिळेल

२०१९-२० च्या बजेटची तुलना गेल्या वर्षाशी केल्यास कळेल की, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीने १०-११% चे रिटर्न आणि शेअर बाजारात १२-१४% रिटर्न मिळेल.

 

क्षेत्र२०१८-१९    २०१९-२०
शेअर बाजार10%12-14%
प्रॉपर्टी 8.5-9%10-11%
म्युच्युअल फंड     12-13%    15-16%

 

क्षेत्र२०१८-१९२०१९-२०
एफडी7-8%6-6.5%
सोने8-9%12%
गोल्ड ईटीएफ7.5-8%12%

 स्रोत: एड्लवाइज असेट मॅनेजमेंट आणि केडिया कमोडिटी

बातम्या आणखी आहेत...