आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानची बाेट; 500 काेटींचे हेराॅइनही जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात जखाै किनाऱ्यापासून दूर अरब सागरात आंतरराष्ट्रीय जल सीमेजवळ भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी संशयास्पद पाकिस्तानी बाेट पकडली. या बाेटीमधून जवळपास चारशे ते पाचशे काेटी रुपयांचे हेराॅइन जप्त करण्यात आले. 


याबाबत गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अल मदिना नावाची ही बाेट आज पकडण्यात आली. या बाेटीमधल्या चालकाने काही पाकिटे समुद्रात फेकली. यापैकी सात पाकिटे सापडली असून त्यामध्ये संशयास्पद हेराॅइनची १९० पाकिटे आढळून आली. याच वर्षाच्या मार्चमध्ये तटरक्षक दल तसेच गुजरात एटीएसने पाेरबंदर किनाऱ्यानजीक अन्य एका बाेटीतून १०० किलाे हेराॅइन जप्त केले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...