आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 People Killed In Accident Near Shekta; At Majalgaon 3 And 4 Were Killed In Accident Near Yermala...

शेकटाजवळील अपघातात 6; माजलगाव 3 तर येरमाळाजवळील अपघातात 4 जण ठार...

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
माजलगाव - Divya Marathi
माजलगाव

बदनापूर / करमाड / माजलगाव/ येडशी : मराठवाड्यात घडलेल्या ३ अपघातांत १२ जण ठार झाले. मृतांत एका सहा महिन्यांच्या बालकाचा समावेश अाहे. औरंगाबादहून जालनाकडे निघालेल्या कारवरील वाहकाचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षावर धडकली. या अपघातात अाॅटाेरिक्षातील एकाच कुटुंबातील पाच जणांसह कारमघील एक अशा सहा जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात माजलगाव येथे कार आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये घडला. या अपघातात परभणीतील माजी उपप्राचर्यांसह त्यांची मुलगी आणि चालक ठार झाला. तिसरा अपघात करमाळा (जि. उस्मानाबाद) येथे घडला. वेळ अमावास्येचा सण सजारा करून बैलगाडीने घरी परणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांच्या बैलगाडीला ट्रकने धडक दिल्याने या अपघातात ४ जण जागीच ठार झाले.

पहिला अपघात

औरंगाबाद-जालना मार्गावर शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोल पंपासमोर बुधवारी (दि.२५)रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. कार चालकाचे कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षावर आदळली. या अपघातात ६ जण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना अपघातात दिनेश रामलाल जाधव(३२), रेणुका दिनेश जाधव(२६), अतुल दिनेश जाधव(६ महिने), वंदना गणेश जाधव(२८), सोहम गणेश जाधव (वय ९, सर्व रा. सर्व शंकरनगर, जुना जालना व संजय हरकचंद बिलाला(रा. माहेश्वरी भवन, अकोला) हे जागीच ठार झाले. तर ३ जण गंभीर जखमी झाले. अकोला येथील बिलाला कुटुंबीय औरंगाबाद येथील एक खासगी कार्यक्रम आटोपून कारने (क्र. एम. एच.३० ए झेड ७७२८) अकोल्याकडे निघाले होते. तर जालना येथून जाधव कुटुंबीय औरंगाबाद येथील एका नातलगाच्या तेरवी कार्यक्रमासाठी औरंगाबादकडे रिक्षाने (क्र. एमएच.२१ बीजी ०१०७) निघाले होते. औरंगाबाद-जालना मार्गावरील अमृतसर पेट्रोल पंपासमोर सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येत असलेल्या जाधव कुटुंबीयांच्या आॅटोरिक्षावर जाऊन आदळली. या वेळी कारचा वेग जास्त असल्याने कारने रिक्षाला जवळपास १०० फुटांपर्यंत फरपटत नेले. या भीषण अपघातात कार व रिक्षा दोन्हीचा चुराडा झाला. या अपघातात ऑटोरिक्षातील पाच जणांसह कारमधील हरकचंद बिलाला (रा. राधाकिशन फ्लॅट, माहेश्वरी भवन, अकोला) हे जागीच ठार झाले तर आशिष श्रीपालजी बिलाला ४०, अंजली अाशिष बिलाला ३८ आणि वाहक विक्की गोळे हे गंभीर जखमी झाले. जखमींवर अाैरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

शेकटा ग्रामस्थांची मदत

दोन्ही वाहनांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच शेकट्याचे माजी उपसरपंच संपत वाघ, सुधाकर वाघ, नईम शेख, मुराद शेख, रफिक शेख, हबीब शेख, मोहसीन कुरेशी व पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी कार व रिक्षामध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. तसेच करमाड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, राहुल मोहतमल,माधव पारवे, सुनील गोरे, नागनाथ केंद्रे, सुशीलकुमार बागुल, नामदेव धोंडकर, तुळशीराम चाबुकस्वार यांनी शेकटा येथील ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले.तर कारमधील जखमी लोकांवर औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

दुसरा अपघात

हा अपघात माजलगाव तालुक्यात कार आणि आरामबसमध्ये मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री साडेअकरा वाजतामाजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे घडला. यात परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य विनायक जावळे (वय ७०), त्यांची सीए असलेली मुलगी रुपाली व चालक विजय कानडे यांचा मृत्यू झाला. जावळे हे पुणे येथील काम अाटाेपून कारने (क्र. एम एच १४-जियु-२७३१ ) माजलगाव मार्गे परभणीला निघाले होते. त्यांची कार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता गंगामसला येथील अजित नॅशनल शाळेजवळ आली असता पुण्याकडे निघालेल्या ट्रॅव्हल्ससाेबत( क्र. एम एच २२-८८९९) कारची समोरसमोर धडक झाली. यात जावळे यांच्यासह त्यांची मुलगी रुपाली (२४ वर्ष ) हे जागीच ठार झाले तर चालक विजय कानडे ( रा.पिंपळगाव गायके ता. जिंतूर) हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी बीडला हलवले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

तिसरा अपघात

येरमाळा : बैलगाडीला ट्रकने धडक दिल्याने तीन महिलांसह चौघे ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ज.) शिवारात बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील कुटुंब बुधवारी वेळ अमावस्येसाठी शेतात गेले होते. बैलगाडीने घरी परतत असताना बैलगाडीला ट्रकने पाठीमागून धडक दिली. यामध्ये फुनुबाई मंतु पवार (६०), रेश्मा माळवदे (३५), गुंजन माळवदे (१२) या तिघी जागीच ठार झाल्या. युवराज दत्तात्रय शेटे (७) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय शेटे (३६) हे जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...