आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यानंतर पार्टनरसोबत चुकूनही Discuss करुन नका या 6 गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न हे बंधन जेवढे खास असते तेवढे नाजूक देखील असते. विचार जुळले तर जीवन आनंदात जाते परंतु जर हे जुळाले नाही तर जीवनात खुप अडचणी येतात. पहिल्या काळात लग्नाची बोलणी घरातील मोठे लोक करत होते आणि त्यांच्यामध्ये कोणीच बोलू शकत नव्हते. ज्यामुळे नाते बिघडण्याची शक्यता खुप कमी राहायची. परंतु आज एकमेकांना समजून घेण्यासाठी दिलेल्या सूटमुळे लग्न जुळाल्यानंतर ते तुटू शकते. कारण लग्नाअगोदर मुला-मुलीमध्ये संवाद होतात. संवाद होण्याचे फायदे असले तरीही याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आज आपण अशाच गोष्टी पाहूया ज्या होणा-या पार्टनरसोबत बोलण्यापासुन वाचले पाहिजे.

 


मोकळे बोलणे
एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रत्येक मुद्द्यांवर मोकळे बोलणे आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा यामुळे नुकसान होऊ शकते. लग्नाअगोदर आपल्या पर्सनल गोष्टी सांगणे आणि त्यांना त्यांच्या पर्सनल गोष्टी विचारणे चुकूचे आहे. यापासुन सर्वच कपल्सने दूर राहिले पाहिजे.
 

जुने अफेयर्स
लग्ना अगोदरच आपल्या जुन्या रिलेशनशिप आणि अफेयर्स विषयी डिस्कस करणे चुकीचे ठरु शकते. हे सांगितल्यानंतर वाद-विवाद होतात. गैरसमज वाढतात आणि यामुळे नाते तुटू शकते.
 

पसंत-नापसंती डिक्स करणे
36 गुण मिळवण्याचा अर्थ हा होत नाही की, तुम्हा दोघांची पसंत-नापसंती सारखीच आहे. यामुळे पार्टनर सोबत आपल्या आवड-निवडी बाबत जास्त बोलू नये. कारण, जर तुमच्या दोघांच्या आवडी-निवडी खुप वेगळ्या असतील तर समोरचा व्यक्ती आपल्या कम्फर्ट लेव्हलचा विचार करतो. हे रिलेशनशिप संपन्याचे सर्वात मोठे कारण बनू शकते.


फॅमिली मॅटर्स
लग्न ठरवतांना दोन्ही कुटूंब आपण एक आहोत असे दाखवतात परंतु लग्न करताना एक नसतात. यामुळे फॅमिली मॅटरवर डिस्कशन करण्यापासुन दूर राहा. आई-वडील, बहिण-भाऊ तुमचे स्वतःचे आहेत, ते प्रत्येक सुख-दुःखात तुमच्यासोबत राहतील यामुळे अशी कोणतीच गोष्टी बोलू नका की, ज्याचा चुकीचा मॅसेज पार्टनर पर्यंत जाईल.


फायनेंशियल सिचुएशन
ही गोष्ट तरुण आणि तरुणी दोघांवर देखील लागु होते. फायनेंशियल गोष्टींविषय घरातील मोठ्यांनी डिस्कस केले तर चांगले राहिल. खुपच आवश्यक असेल त्यांच्यासोबत बोला. परंतु एकमेकांमध्ये या गोष्टीवर बोलून वाद घालणे टाळा.

 

निगेटिव्ह नेचर
तरुणींचे डॉमिनेटिंग असणे ही गोष्ट नवीन नाही. परंतु आपले हे नेचर जगजाहिर करणे चांगली गोष्ट नाही. आपल्या या नेचरवर डिस्कस करणे पार्टनरला घाबरवू शकते यामुळे या बाबतीत थोडे शांत राहा.

बातम्या आणखी आहेत...