आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन खात्याच्या बजेटमध्ये 6 पट वाढ, आदित्य ठाकरे मंत्री होताच सुगीचे दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्रिपदाची धुरा सांभाळताच अर्थसंकल्पात नेहमीच दुर्लक्षित राहणाऱ्या पर्यटन खात्यासाठी यंदा १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गेल्या दोन वेळच्या अर्थसंकल्पांच्या तुलनेत यात यंदा तब्बल ६ पट वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी भरभरून दिले असताना मराठवाडा आणि विदर्भाच्या पर्यटन विकासासाठी ठेंगा दाखवण्यात आला आहे.

२०२०-२१ : रु. १४०० कोटी 
वरळीत आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल निर्मिती, मुंबईचा पर्यटन विकास, हाजी अली परिसराचा विकास, महाविद्यालयात पर्यटन अभ्यासक्रम, लोणार सरोवराचा विकास, अचलपूर शहराचा पर्यटन विकास, समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, पाटण तालुक्यातील धबधबा तसेच सज्जनगड ते परळी रोपवे, घाटमाता ते हुंबरळी, जंगली जायगड आणि केमसे नाका येथे वॉकिंग ट्रॅक, शिवनेरी आणि नरनाळा किल्ल्याचा विकास, अंबाबाई देवस्थानाचा विकास, पर्यटनस्थळांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, औरंगाबादच्या ३ पुरातन पुलांचे नूतनीकरण आदी.

२०१९-२० : रु. २९५ कोटी
ठळक वैशिष्ट्ये-लोकसभा निवडणुकांमुळे अंतरिम बजेट सादर करण्यात आले. यात तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, शिर्डी येथे पर्यटनाचा पथदर्शी प्रकल्प, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, शिर्डी, मुंबई येथे पर्यटन पोलिस आणि सावंतवाडी येथे सुरक्षारक्षक पर्यटन प्रशिक्षण केंद्राची स्थापना. 

२०१८-१९ : रु. २२६ कोटी 
ठळक वैशिष्ट्ये-गणपती पुळे विकास, माचाळचा (जि. रत्नागिरी) पर्यटन विकास, रामटेक तीर्थक्षेत्र विकास, सिंधुदुर्ग किल्ल्याचे संवर्धन, सिरोंचा जीवाश्म संग्रहालयाची स्थापना, कातळ शिल्पांचे संरक्षण व संवर्धन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय सुशोभीकरण, सोव्हिनिअर शॉपी. 

थेट भाष्य आणि बजेटही
यंदा पहिल्यांदाच पर्यटनासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या २ वर्षांच्या अर्थसंकल्पात पर्यटन हे दुर्लक्षित होते. बजेटमध्ये थेट तरतुदीचा उल्लेख नव्हता. यंदा मात्र हा उल्लेख करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...