आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर करत नव्हते मुलावर उपचार, उपचार न करण्याचे कारण ऐकून किंचाळून जमिनीवर बेशुद्ध पडली आई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेर (राजस्थान) - जवाहर रूग्णालयाच्या ट्रोमा सेंटरमध्ये कित्येक लोक उपस्थित होते परंतू इतकी गर्दी असूनही सेंटरमध्ये भयान शांतता पसरली होती. एका आईच्या किंचाळण्याचा आवाज या भयान शांततेला भेदत सेंजरमध्ये घुमत होता. गुजरातमधील महिला सैलानी तिच्या एकुलत्या एक मुलाला वाचविण्यासाठी डॉक्टरांसमोर हाथ जोडत होती. त्यांच्याकडे विनवणी करत होती. पण डॉक्टर उपचार करत नव्हते.  इतक्यात 'त्यांना आता सत्य सांगावे लागेल' डॉक्टरांनी असे म्हणताच, आई मोठ्याने ओरडून जमिनीवर बेशुद्ध पडली. तर मुलाचे वडील एका कोपऱ्यात तोंड लपवून रडत होते. कारण त्यांनी माहीत होते की त्यांचा मुलगा आता ह्या जगात नाही. मंगळवार रोजी एका गुजराती परिवाराचा अपघात झाला होता. त्यामध्ये 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता तर पती-पत्नीला किरकोळ मार लागला होता.

 

गुजराती पर्यटक तनोट वरून परत येत असताना परवीर आणि मोकला दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर 108 चे पायलट नारायण सिंह आणि ईएमटी जितेंद्र गर्ग यांनी अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विरेंद्र (35) व दीक्षा (32) किरकोळ जखमी झाले. तर गंभीररित्या जखमी झालेल्या शुभमचा (6) या अपघातात मृत्यू झाला.

 

आईला वाटले डॉक्टर करत नाहीत उपचार
ट्रोमा सेंटरच्या आपत्कालीन विभागातील बेडवरील आपल्या मुलाचा डॉक्टर उपचार करत नसल्याचे पाहून त्या आईला असे वाटू लागले की डॉक्टर मुलाकडे लक्ष देत नाही. पण मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 

बातम्या आणखी आहेत...